बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे – बंगलुरु महामार्गावर धारवाडजवळ मिनी बस आणि डंपर यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला असून त्यात मिनी बसमधील ९ महिला जागीच ठार झाल्या आहेत. ११ महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर धारवाड रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
या सर्व महिला दावणगिरी येथील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्या आहेत. दावणगिरी येथील २० महिला गोव्याला एका मिनी बसमधून सहलीला जात होत्या. काल रात्री त्या दावणगिरीहून निघाल्या होत्या. पहाटे साडेपाच वाजता धारवाडपासून काही अंतरावर विरुद्ध दिशेने आलेल्या एका डंपरने मिनी बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती़ की दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला आहे. त्यात ९ महिलांचा जागीच मृत्यु झाला. ११ महिलांना धारवाडमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.