सातारा न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Dr. Pratibha Shinde | सातारा जिल्ह्यातील वाई नगरपालिकेच्या (Wai Municipal Council) नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे आणि त्यांचे पती सुधीर शिंदे (Sudhir Shinde) यांना ठेकेदाराकडून लाच (Bribe) घेताना अटक (Arrest) करण्यात आली होती. याप्रकरणी भाजप (Satara BJP) नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे (Mayor Dr. Pratibha Shinde) यांच्यावर राज्य शासनाने अपात्रतेची कारवाई केली आहे. वाई नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना उरर्वरित कालावधीसाठी बडतर्फ करण्याचा निर्णय नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांनी घेतला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्याचे नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, डॉ. शिंदे यांना पुढील सहा वर्षे पालिका सदस्य आणि इतर कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या सदस्य होण्यास त्यांना अपत्र ठरविण्यात आले होते.
या आदेशाविरोधात डॉ. शिंदे यांनी अॅड. प्रताप परदेशी (Adv. Pratap Pardeshi), अॅड. अभिषेक अवचट (Adv. Abhishek Avachat) व अॅड. अभिजीत खांदरे (Adv. Abhijeet Khandre)
यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court)याचिका दाखल केली आहे.
या याचिकवेर उच्च न्यायलयाने 17 ऑगस्ट 2021 पर्यंत निवडणूक घेण्यास स्थगिती दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नगराध्यक्षा डॉ. शिंदे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी भाजपकडून थेट नगराध्यपदासाठी निवडणूक लढवली होती.
त्या निवडून आल्यानंतर वाईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गटाला मोठा धक्का बसला होता.
डॉ. शिंदे या 2016 पासून नगराध्यक्ष या पदावर कार्यरत होत्या.
शहराच्या शौचालयाच्या बांधकामाचे देयक काढण्याच्या मोबदल्यात पती मार्फत 14 हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी पती आणि डॉ. शिंदे यांच्याविरुद्ध 1 जून 2017 रोजी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.
त्यांच्या अटकेनंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात (District Sessions Court) जामीन घेतला होता. दरम्यानच्या काळात पालिकेतील 16 नगरसेवकांनी त्यांना पदावरुन बाजूला करा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती.
त्याची सुनावणी 20 ऑगस्ट 2020 आणि 30 सप्टेंबर 2020 रोजी झाली होती.
त्यानंतर सरकारने डॉ. शिंदे यांना नगराध्यक्ष पदावरुन हटविण्याचा निर्णय दिला.
Web Title : Temporary relief to Dr. Pratibha Shinde from high court
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update