नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाढत्या तापमानाबाबत शास्त्रज्ञांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सतत वाढणारे तापमान केवळ पृथ्वीसाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी चिंतेचा विषय आहे. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी सेंटर फॉर कॉस्मोलॉजी आणि एस्ट्रोपार्टिकल फिजिक्सद्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, विश्वाचे तापमान वेगाने वाढतच चालले आहे. मागील 10 अरब वर्षांमध्ये विश्वाच्या थर्मल इतिहासाची तपासणी केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
अभ्यासानुसार, विश्वात गॅसेसचे सरासरी तपामान मागील 10 अरब वर्षात 10 पटीने वाढले आहे. शास्त्रज्ञांना संशोधनात आढळले की, तापमान आज जवळपास 20 लाख डिग्री केल्विनपर्यंत पोहचले आहे. जे सुमारे 4 मिलियन डिग्री फॅरनहाईट आहे. संशोधक फेलो यी कुआन चियांग यांच्यानुसार, तापमानाचे नवे मापन 2019 मध्ये भौतिकशास्त्रात नोबेल प्राईज प्राप्त शास्त्रज्ञ जिम पीबल्स यांनी केलेल्या प्रभावशाली कार्याला योग्य ठरवत आहे. जिम पीबल्स यांनी आपल्या सिद्धांतात सांगितले होते की, विश्वात मोठ्या प्रमाणात संरचना कशी बनते.
या कारणामुळे वाढत आहे तापमान
अभ्यासात सांगण्यात आले आहे की, विश्वाच्या विकासासह गुरुत्वाकर्षण बळ अंतराळात काळे पदार्थ आणि गॅस एकाचवेळी आकाशगंगा आणि आकाशगंगांच्या समुहांमध्ये खेचले जाते. या प्रक्रियेतून निघणार्या उर्जेने भीषण उष्णता निर्माण होत आहे. या संशोधनाचे संचालन करण्यासाठी शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून दूर गॅसच्या तापमान मोजण्यासाठी एका नवीन पद्धतीचा वापर केला. नंतर शास्त्रज्ञांनी त्या मापाची तुलना पृथ्वीच्या जवळच्या आणि सध्या असलेल्या गॅसेसशी केली.
ब्रह्मांडात होत आहेत विविध घटना
शास्त्रज्ञांनी सांगितले की, ब्रह्मांडाच्या संरचनेच्या गुरुत्वाकर्षण बळामुळे ब्रह्मांड काळाच्या ओघात आणखी गरम होत आहे आणि याच्या भविष्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. ब्रह्मांडाच्या तापमानात वाढ कशी झाली, हे पहाण्यासाठी प्लँक आणि स्लोअन डिजिटल स्काय सर्वेच्या डेटाचा उपयोग करण्यात आला होता. अभ्यासाच्या प्रमुख लेखकाने सांगितले की, आकाशगंगा आणि संरचनेच्या गठणाच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे ब्रह्मांड गरम होत आहे. त्यांनी सांगितले की, या दोन्ही घटना खुप वेगवेगळ्या प्रमाणात होत आहेत, ज्यांचा आपसात काहीही संबंध नाही.