नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात दररोज अनेक ठिकाणी भूकंप होत असतात आणि शेकडो लोक भूकंपाने प्रभावित राहतात. अशा स्थितीत लोकांच्या सुरक्षेसाठी गुगलने एक नवे फीचर रोलआऊट केले आहे, जे यूजर्सना भूकंप येण्यापूर्वी अलर्ट देईल आणि ते सावध होऊ शकतील. या अलर्टच्या मदतीने लोक भूकंप येण्यापूर्वी सतर्क होतील. हे फीचर अँड्राईड प्लॅटफॉर्मसाठी सादर केले आहे आणि अँड्राईड यूजर्स हा अलर्ट आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा शेयर करू शकतील.
गुगल ब्लॉगवर दिलेल्या माहितीनुसार गुगलने अँड्रॉईड फोन्समध्ये अर्थक्वेक वॉर्निंग टूल अॅड केले आहे. सोबतच हे देखील स्पष्ट केले आहे की, हे टूल सध्या कॅलिफोर्नियामध्येच रोलआऊट करण्यात आले आहे आणि तेथील यूजर्सच सध्या याचा वापर करू शकतील. सोबतच सुरूवातीला हे सॅमसंग गॅलक्सीमध्ये उपलब्ध केले जाईल.
अर्थक्वेक वॉर्निंग टूल आल्यानंतर तुम्हाला अँड्रॉईड फोनवर भूकंपचा अलर्ट मिळेल. गुगलची अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम असणारे अँड्रॉईड फोन यूजर्स केवळ याचा लाभ घेऊ शकतील. गुगलचे म्हणणे आहे की, ते अँड्राईड डिव्हाईसेसमध्ये भूकंपाचे अलर्ट पाठवण्यासाठी यूएस जियोलॉजिकल सर्वेसोबत मिळून काम करत आहेत. जपान आणि कॅलिफोर्निया अगोदरच लँड बेस्ड सेन्सरचा वापर करत आहेत, ज्याद्वारे भूकंप येण्यापूर्वी यूजर्सला अलर्ट मिळतो. गुगल भूकंप अलर्टचे हे फीचर मागील चार वर्षांपासून टेस्टींग करत आहे.
असे काम करेल हे टूल
गुगलचे हे नवे टूल खूप सोप्या पद्धतीने काम करते, भूकंपाच्या स्थितीत गुगल ताबडतोब अर्थक्वेक डिटेक्शन सर्व्हरला एक सिग्नल देईल. याशिवाय जेथे भूकंपासारखी लक्षणे दिसत आहेत, तेथील लोकेशन शेयर करेल. सोबतच यानंतर सर्व्हर अन्य फोन्सकडून मिळालेली माहिती एकत्रित करून हे समजून घेण्याचा प्रयत्न करेल की, खरोखरच भूकंप येत आहे का.