नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या वेबजगात Netflix हे सगळेजण वापरताना दिसतात. त्यासाठी आपल्याला १९९ रुपये पासून ७९९ रुपयांचा रिचार्ज करावा लागतो. नेटफ्लिक्सचे नवीन मार्केटिंग प्रमोशनल ऑफर चालली असून त्याद्वारे नवीन आणि सध्या असलेल्या निवडक युजर्सना ५ रुपयात सब्सक्रिप्शन दिले जाणार असून तशी माहिती नेटफ्लिक्सच्या कस्टमर केयरकडून मिळत आहे.
काय म्हणाले Netflix कस्टमर केयर?
हे कंपनीद्वारे चालवले जाणारे एक नवीन प्रोमो डिस्काऊंट असून यात सध्या वापरत असलेल्या आणि काही निवडक नवीन ग्राहकांसाठी ही ऑफर उपल्सब्ध असेल. एखाद्या चालू असलेल्या युजरने त्याचे अकाउंट उघडले आणि या ऑफरचे पॉप-अप आले तर त्यावर क्लिक करत ही ऑफर ऍक्टिव्हेट करू शकता. हीच प्रोसेस नव्याने Netflix वर साइन इन करणाऱ्यांसाठी आहे. अशात जर का तुमच्या नशिबाने साथ दिली तर तुम्हाला Netflix चे सब्सक्रिप्शन ५ रुपयात मिळू शकते.