नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google ची लोकप्रिय ईमेल सर्व्हिस Gmail चं सर्व्हर डाउन झालं आहे, त्यामुळं युजर्सना मेल पाठवण्यात अडचण निर्माण झाली आहे. Gmail च्या डाउन होण्याची समस्या फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये ही समस्या आहे. याची तक्रार युजर्सनी सोशल मीडियावर ट्विटरद्वारे शेअर केली, आणि सांगितलं की Gmail सोबतच Google Drive चा वापर करताना देखील अडचण निर्माण होत आहे.
डाउनडिटेक्टर ने Gmail च्या डाउन झाल्याची माहिती शेअर करत सांगितलं की, ते Gmail मध्ये मेल पाठवू शकता नाहीत, Google Drive वरून देखील कोणती फाईल ओपन होत नाही. त्यांचं म्हणणं आहे की, Gmail आणि Google Drive सोबतच youtube मध्ये देखील सर्व्हर च्या समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे व्हिडीओ अपलोड होण्यास अडचण येत आहे. Gmail कडून ही टेक्निकल समस्या सोडविण्यासाठी काम सुरु करण्यात आले आहे.
Gmail च्या अशा प्रकारच्या अडचणी भारताशिवाय ऑस्टिलिया आणि जपान सोबत जगातील अनेक देशांमध्ये दिसून येत आहे. Gmail मध्ये कोणतीही फाईल जोडण्यासाठी लोकांना अडचण येत आहे. एका भारतीय यूजर ने ट्विटर वर लिहिलं आहे, Gmail खूप वेळापासून डाउन आहे, यामध्ये कोणती फाईलही जोडता येत नाही. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं आहे की, पहिल्यांदा माझं इंटरनेट अनस्टेबल नाही पण Gmail झालं आहे.
Gmail डाउन होण्याची ही पहिली वेळ नाही, मागच्या 2 महिन्यात Gmail दुसऱ्यांदा डाउन झाला आहे. याआधी लोकांना लॉगइन करण्यासाठी अडचण येत होती. पण काही वेळातच कंपनीने ही अडचण दूर केली होती. अशी आशा आहे की यावेळीही Gmail ची टीम ही समस्या लवकर सोडवेल.