बहुजननामा ऑनलाईन- भारतात आई वडिलानंतर शिक्षकाला सर्वोच्च स्थान दिले जाते. कोणत्याही विद्यार्थ्याने शाळेचे शिक्षकांचे नाव मोठे केले तर तो क्षण शिक्षकासाठी सर्वात अभिमानाचा क्षण असतो. परंतु सध्याच्या काळात मात्र या पवित्र नात्याला अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी बदनाम केले. काही वासनांध लोकांनी या नात्याला काळिमा फासला आहे. अशा बर्याच घटना अलीकडेच घडल्या आहेत आणि घडतही आहेत. अशाच काही घटना आज तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत.
शिक्षक आणि विद्यार्थी नग्न स्थितीतील व्हिडिओ कॉल करत असत
जालंधरमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ज्यामध्ये एक मुलगा व्हिडीओ कॉल करुन समोरच्या महिलेला नग्न अवस्थेत समोर येण्यास सांगतो. व्हिडिओमध्ये ती बाथरुममध्ये दिसत आहे, तर मुलगा वारंवार त्या महिलेला व्हिडिओसमोर येण्यास सांगत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी महिला जालंधरमधील एका शाळेत शिक्षिका असून तो मुलगा तिचा विद्यार्थी आहे. याप्रकरणाबाबत जालंधरचे शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले की, हा व्हिडीओ शाळेत चित्रित करण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळा याबाबत कोणतीही भुमिका घेऊ शकत नाही. मात्र काही दिवसांपुर्वी ही महिला शिक्षिका करारावर आली होती. पण काही महिन्यातच तिला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. तर व्हिडीओतील संबंधित विद्यार्थालाही काही दिवसांपुर्वी शाळेतून बेदखल करण्यात आले आहे. काही वैयक्तिक कारणास्तव त्याला शाळेतून काढण्यात आले आहे.
विद्यार्थ्याशी अवैध संबंधासाठी शिक्षिकेने केली पतीची हत्या
यावर्षी जानेवारी महिन्यात हरियाणातील पानिपतमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली. एका तीस वर्षीय महिला शिक्षकीचे तिच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याशी अवैध संबंध होते. दोघांमधील संबंध खूप चांगले वाढू लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समलखा भागातील दलबीरसिंगचे लग्न चार वर्षापुर्वी रोहतक येथील अमितासोबत झाले होते. त्यांना एक मुलगीही आहे. अमिताने पोस्ट ग्रॅज्युएशन केले होते. ती अभ्यासातही खूप हुशार होती. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या शेजारी राहणाऱ्या आयटीआय विद्यार्थी अमितला शिकवत होती.
शिकविण्याच्या बहाण्याने अमिता आणि तिचा विद्यार्थी अमित यांचे अवैध संबंध निर्माण झाले. काही दिवसानंतर दलबीर व त्याच्या कुटुंबीयांना याबाबत समजले असता त्याचे अमितासोबत वाद झाले. दलबीर तिथून घर बदलून दुसर्या जागी शिफ्ट झाला. यामुळे अमिताच्या मनात खुप राग होता. तिने अमितला सोबतीला घेऊन दलबीरला हटवण्याची योजना आखली. त्यांच्या योजनेनुसार अमिताने १८ डिसेंबरला दलबीरला चहामध्ये गुंगीचे औषध टाकले. त्यामुळे दलबीर बेशु्द्ध झाला. यादरम्यान अमिता आणि अमितने त्याचे हात पाय बांधले. पण इतक्यात दलबीर शुद्धीत आला त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमिता आणि अमित यांनी त्याच्या डोक्यात वार केले त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
शिक्षक विद्यार्थ्यांशी जबरदस्तीने संबंध ठेवत असे.
गेल्या वर्षी मेमध्ये चंदीगडमध्ये एका तेहतीस वर्षीय महिला शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली. विद्यार्थ्यावर शारीरिक अत्याचार केल्यामुळे मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी दहावीत शिकत होता. घराच्या जवळच राहणाऱ्या एका महिला शिक्षकीकडे तो शिकवणीला जायचा. यावेळी शिक्षिकेने विद्यार्थ्याशी जबरदस्तीने अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर जेव्हा संबंधित विद्यार्थी नापास झाला तेव्हा त्याचे पालक शिक्षकेकडे जाऊन तक्रार करत मुलगा यापुढे तिच्या शिकवणीत शिकणार नसल्याचे सांगतले. त्यांनी मुलाला घरी नेले. मात्र थोड्या वेळाने, शिक्षिका त्याच्या घरी पोहोचली आणि तेथेच सिरप प्यायली. झालेला प्रकाराने घाबरून मुलाच्या पालकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शिक्षिकेला रुग्णालयात दाखल केले.
हे सर्व पाहून मुलाला धक्का बसला. जेव्हा त्याच्या पालकांनी समुपदेशक संगीता जुंद यांची मदत घेतली तेव्हा काहीतरी वेगळंच समोर आलं. शिक्षिकेने त्याला मारहाण केली होती आणि त्याच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवत असल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. इतकेच नाही तर शिक्षकीने मुलाला सिमकार्ड व मोबाईलही दिला होता. जेणेकरून ती त्याच्याशी संवाद साधत राहिल. विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये त्याचे अनेक अश्लील मेसेजेसही सापडले. यानंतर पोलीसांनी शिक्षिकेला न्यायालयात हजर केले. तेथून कोर्टाने तिला तुरूंगात पाठविले.
शिक्षकांनी विद्यार्थ्याला ‘इश्क’ प्रकरणात नेले
हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षी जुलैमध्ये एक महिला शिक्षिका आणि तिच्या अल्पवयीन प्रियकर विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी शाळेत संबंधित महिला शिक्षिका शिकवित होती. तर विद्यार्थी त्याच शाळेत १० वीच्या वर्गात शिकत होता. मात्र अचानक एक दिवस शिक्षिका आणि तो विद्यार्थी गायब झाले. त्या दोघांमधील प्रेमसंबंध इतके वाढले होते की, ते दोघेही घरातून पळून गेले होते. यासंदर्भात विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी महिला शिक्षकेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
जेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिकेला महिला शिक्षकेवर शंका आली, तेव्हा त्यांनी दोन्ही कुटुंबांना बोलावून संपूर्ण बाब स्पष्ट केली. पण मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आणि शिक्षकेवर मुलाच्या अपहरणाचा आरोप केला. तपासादरम्यान आरोपी महिला शिक्षिका आणि अल्पवयीन विद्यार्थ्यामध्ये बरेच जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे आढळले. मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दोघे एकमेकांशी जोडले गेले होते. शाळेतही दोघेही अनेकदा एकमेकांशी संवाद साधताना दिसायचे. नंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकेला अटक केली. तिने विद्यार्थ्यांसह प्रथम हिसारला गेलो आणि नंतर दोघेही दिल्लीला गेलो असल्याची कबूली चौकशीत दिली. तर परस्पर संमतीने दोघे पळून गेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.