नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शाळेच्या आवारात सेक्स संबंध ठेवणार्या प्रेमळ जोडप्याच्या ग्रामस्थांनी जोरदार मारहाण केली. प्रेमी या शाळेत शिक्षक आहे तर त्याची मैत्रिण ग्रामीण बाल देखभाल विकास विभागांतर्गत अंगणवाडी येथे कार्यरत असून तिचे कार्यालय या शाळेत आहे. हे खळबळजनक प्रकरण तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यातील आहे. ही लाजीरवाणी घटना मंगळवारी नामक्कल जिल्ह्यातील एस उदुप्पम शासकीय शाळेत घडली.
ही शाळा पुदानसंदाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. शाळेचा ३८ वर्षीय शिक्षक सरावनन आणि त्याच शाळा परिसरातील कार्यरत असलेल्या जयंती यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. शाळा सुटल्यानंतर हे दोघे भेटायचे आणि शाळेच्या परिसरात सेक्स करायचे. शाळकरी मुलांनी या दोघांना बर्याच वेळा आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते आणि कुटुंबीयांकडे तक्रार केली होती.
त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी संतप्त पालकांनी शिक्षकाला रंगेहाथ पकडले आणि जोरदार मारहाण केली. शाळेच्या मुख्याध्यापकाने सरावननंविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली असून अंगणवाडी सेविका जयंतीबद्दल आपल्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.