नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Taxpayers | इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax department) ने करदात्यांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत आता टॅक्सपेयर्स (Taxpayers) ला वेगळ्या प्रकारच्या तक्रारीसाठी वेगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विभागाने फेसलेस असेसमेंट स्कीम (Faceless Assessment Scheme) अंतर्गत अनेक प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यासाठी टॅक्सपेयर्ससाठी तीन वेगवेगळे ईमेल आयडी (Three different email id) जारी केले आहेत.
सोपे झाले तक्रार करणे
फेसलेस असेसमेंट स्कीम म्हणजे ई-असेसमेंट (e-assessment) अंतर्गत टॅक्सपेयर्स आणि टॅक्स अधिकारी आमने-सामने नसतात. यामुळे टॅक्सपेयर्सला तक्रार करणे सोपे जाते. समस्येवर मार्ग लवकर काढला जातो. 2019 मध्ये केंद्राने ही योजना लाँच केली होती.
कोणत्या ई-मेल आयडीवर करायची आहे तक्रार
– फेसलेस मूल्यांकन स्कीमसाठी टॅक्सपेयर्स Samadhan.faceless.assessment@incometax.gov.in वर तक्रार करू शकतात.
– टॅक्सपेयर्स फेसलेस पेनल्टी samadhan.faceless.penalty@incometax.gov.in चा वापर करू शकतात.
– फेसलेस अपीलसाठी samadhan.faceless.appeal@incometax.gov.in वर ई-मेल केल्यास लवकर समस्या सुटू शकते.
Web Title :- taxpayers income tax latest news it department released 3 new email ids for complaints taxpayers check details
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Eknath Khadse | आठवडाभरापासून एकनाथ खडसे रुग्णालयात
Zika Virus | पुणे जिल्ह्यातील ‘झिका’ची अतिसंवेदनशील 79 गावांची जाहीर, वाचा लिस्ट