बहुजननामा ऑनलाईन – इंधन दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पेट्रोलने तर शंभरी गाठली आहे. डिझेलही शतकाकडे मार्गक्रमण करत आहे. त्यात स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे. सामान्यांना महागाईचे चटके बसत असताना केंद्र सरकारकडून कोणतीही उपाय योजना होताना दिसत नाही. उलट यासर्वाचे खापर मागच्या सरकारांवर फोडले जात आहे. वास्तविक इंधन दर वाढत असले तरी पेट्रोल आणि डिझेलची मूळ किंमत कमी आणि करांचेच प्रमाण अधिक आहे. जाणून घेऊ कसे ते..
व्हॅटची आकारणी प्रत्येक राज्यात वेगवेगळी
पेट्रोलियम मंत्रालयाच्या प्लॅनिंग अँड अँनालिसिस सेल (पीपीएसी) संकेतस्थळानुसार
राज्य सरकारे पेट्रोलवरील कर संकलनासाठी विविध पद्धती अवलंबतात त्यामुळे इंधन दरांवर आकारण्यात येणारा व्हॅट प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरांत किंचित अधिक प्रमाणात व्हॅट आकारणी केली जाते.त्यामुळे या तीनही ठिकाणी प्रतिलिटर पेट्रोलवर २६.८६ रुपये व्हॅट आकारला जातो.तर उर्वरित महाराष्ट्रात हेच प्रमाण २६.२२ रुपये एवढे आहे.
विशेष म्हणजे राज्य सरकारांच्या तुलनेत पेट्रोलवर केंद्र सरकार अधिक प्रमाणात कर आकारण्यात येत आहे. प्रतिलिटर राज्य आणि केंद्र सरकार पेट्रोलवर अनुक्रमे सरासरी २० आणि ३३ रुपये कर आकारतात.
प्रतिलिटर पेट्रोलच्या किमती आणि त्यावर लागणारे कर
मूळ किंमत राज्याचा कर केंद्रीय कर डीलरचे कमिशन एकूण किंमत
रु२९.७० रु२६.९० रु३३ रु३.६९ रु९३.२४
रु२९.७० रु२६.२० रु३३ रु३.६९ रु९२.६१
रु२९.७० रु२६ रु३३ रु३.६९ रु९२.३६
रु२९.७० रु२५ रु३३ रु३.६९ रु९२.४१
रु२९.७० रु२५ रु३३ रु३.६९ रु९१.३८
रु२९.७० रु२४.७० रु३३ रु३.६९ रु९१.११
रु२९.७० रु२२.७० रु३३ रु३.६९ रु८९.११
रु२९.७० रु२२.७० रु३३ रु३.६९ रु८९.१०
रु२९.७० रु२२.५० रु३३ रु३.६९ रु८८.९७
रु२९.७० रु२०.६० रु३३ रु३.६९ रु८७.०३