नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर अनेक तरुण टॅटू काढून आपला आनंद व्यक्त करत आहेत. काही लोकांनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही टॅटू काढला आहे. टॅटू आर्टीस्टनुसार, यामध्ये नरेंद्र मोदींच्या टॅटूचे प्रमाण सर्वात जास्त आहे. अमित शाह यांचाही टॅटू अनेकजण काढत आहेत.
टॅटू आर्टीस्टनुसार, जेव्हापासून कलम 370 हटवण्याचा निर्णय झाला आहे तेव्हापासून अनेकजण टॅटू काढत आपलं देशप्रेम व्यक्त करत आहेत. टॅटूमध्ये प्रोटेस्टबद्दल बोलायचे झाले तर, मोदी लाटेपासूनच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे टॅटू काढले जात आहेत.
देशभक्तीच्या टॅटूंची क्रेज
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याव्यतिरीक्त तरुण भारताचा नकाशा आणि तिरंगा यांचा टॅटू काढत देशप्रेम व्यक्त करत आहेत. तरुणांमध्ये सत्यमेव जयते, अशोक चक्र आणि भारतीय झेंडा बनवण्याची क्रेज जास्त वाढताना दिसत आहे. याशिवाय तरुण आर्मी, भगत सिंह यांचे पोर्ट्रेट टॅटूही बनवत आहेत.
एवढी आहे किंमत
किंमतीबाबत सांगताना टॅटू आर्टीस्ट म्हणतो की, “साधारणपणे एका टॅटूची फी 4000 ते 5000 पर्यंत असते. कारण आम्ही यासाठी चांगल्या शाईचा वापर करतो. पोट्रेट टॅटूबद्दल बोलायचे झाले तर याची किंमत 10 हजारांपासून सुरु होते आणि 50 हजारांपर्यंत असते. ही किंमत टॅटूच्या साईजवर अवलंबून असते.”