नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Motors Stock | जर तुम्ही टाटा ग्रुप (Tata group) च्या शेअर्सवर डाव लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टाटा मोटर्सच्या शेअर्सवर (Tata Motors Stock) लक्ष ठेवू शकता. अनेक जागतिक ब्रोकरेज हे ऑटो स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करत आहेत. जेपी मॉर्गनने टाटा मोटर्सच्या स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे. त्याची टार्गेट प्राईस 530 रुपये ठेवली आहे (Rakesh jhunjhunwala portfolio tata group stock).
24 टक्केपर्यंत रिटर्न
अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला सपोर्टेड – समर्थित टाटा ग्रुप (Tata group) ची कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मुख्यत: हेल्दी व्यापाराच्या दृष्टीकोनातून 24 टक्के वाढण्याची क्षमता आहे. जेपी मॉर्गन म्हणाले की टाटा मोटर्स डिलिव्हरीसाठी चांगले नियोजन करत आहे. तसेच कंपनी आर्थिक वर्ष 24 पर्यंत शून्य निव्वळ डेबिट मिळवेल.
गेल्या एका महिन्यात काउंटर 15 टक्क्यांहून जास्त वाढले आहे. सध्या हा शेअर 427.40 रुपयांवर आहे. म्हणजेच, डाव लावल्यास 24.01% नफा मिळू शकतो. (Tata Motors Stock)
राकेश झुनझुनवाला यांची हिस्सेदारी
टाटा मोटर्स हा गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा आवडता आणि सर्वाधिक गुंतवणूक केलेला स्टॉक आहे, ज्यांना भारतीय शेअर बाजाराचा बिग बुल म्हटले जाते. कंपनीच्या नवीनतम बीएसई शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, त्यांच्याकडे 39,250,000 इक्विटी शेअर्स आहेत, जे ऑटो मेजरमध्ये 1.2 टक्के शेअर्स आहेत.
टाटा मोटर्स ही भारतातील एक अग्रगण्य ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी आहे जी व्यावसायिक वाहने आणि प्रवासी वाहनांचे डिझाइन, उत्पादन आणि विक्री करते आणि 2008 मध्ये जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) चे अधिग्रहण केले आहे.
(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)
Web Title :- Tata Motors Stock | rakesh jhunjhunwala portfolio tata group stock tata motors stock to buy 530 rupees expert bullish
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला; म्हणाल्या – ‘आणखी एक तारीख पाहू’
- PM Narendra Modi | देहूतील कार्यक्रमात अजित पवार भाषणापासून ‘वंचित’, PM मोदीही म्हणाले – ‘दादांना बोलू द्या’; जाणून घ्या नेमकं काय घडलं ?
- PM Narendra Modi Visit Dehu | दौरा PM मोदींचा अन् चर्चा अजित पवारांची, विमानतळावरील ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल