मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – TATA Group | ब्रँड फायनान्स (Brand Finance) च्या ‘हॉटेल्स-50 2021’च्या अहवालानुसार जगात महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटानंतरही सर्वोत्तम हॉटेल ब्रँडच्या यादीत टाटा ग्रूप (TATA Group) च्या ‘ताज'(taj hotel mumbai) या प्रीमिअम हॉटेल ब्रँडनं जगातील मातब्बर कंपन्यांवर मात करत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. जगातील सर्वात मजबूत ‘हॉटेल ब्रँड’ म्हणून ‘ताज हॉटेल्स’ला बहुमान मिळाला असून याची माहिती टाटा समूहाच्या हॉस्पिटॅलिटी अँड इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडनं(Tata Group’s Hospitality and Indian Hotels Company Limited) दिली आहे. दरम्यान, ‘ताज ब्रँड’चा सर्वोत्तम हॉटेल ब्रँड्सच्या क्रमवारीत 2016 साली पहिल्यांदाच समावेश झाला होता. त्यावेळी ‘ताज’ला 38 वं स्थान मिळालं होतं.
tata groups record beating foreign companies taj has become strongest brand world
ब्रँड फायनान्स विपणन गुंतवणूक, ग्राहक संवाद, कर्मचाऱ्यांचे समाधान आणि कॉरपोरेट प्रतिष्ठा (Brand finance marketing investment, customer communication, employee satisfaction and corporate reputation)अशा मानकांच्या आधारे जागतिक ब्रँड मूल्यांकन कन्सल्टंन्सी कंपनी ब्रँड किती मजबूत आहे हे निश्चित करते. कंपनीच्या अहवालानुसार मानकांनुसार ‘ताज’ (ब्रँड मूल्य 29.6 कोटी डॉलर) 100 पैकी 89.3 गुणांसह AAA ब्रँड रेटिंगसह जगातील सर्वात मजबूत हॉटेल ब्रँड ठरला आहे. ताज’नंतर प्रीमिअर दुसऱ्या स्थानावर, मेलिना हॉटेल्स इंटरनॅशनल तिसऱ्या, एनएच हॉटेल ग्रूप चौथ्या आणि शांग्रीला हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स पाचव्या स्थानावर आहे.
गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान
टाटा समुहाने नेहमीच आपली गुणवत्ता टिकवण्याबरोबरच सामाजिक कार्यातही काम करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. गेल्या 100 वर्षात सर्वाधिक दान करून जमशेदजी टाटा ‘जगात भारी’ परोपकारी ठरले आहेत. त्यामुळे टाटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हुरुन रिपोर्ट आणि एडेलगिव फाउंडेशनच्या वतीने दान करणाऱ्या ट़ॉप 50 लोकांची एक यादी तयार केली असून त्यामध्ये टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) हे प्रथम स्थानी आहेत. गेल्या 100वर्षात जमशेदजी टाटा यांनी तब्बल 102 बिलियन डॉलर्सचं दान दिलं आहे. टाटा यांनी प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे.
web title: TATA Group | Tata Group’s ‘Taj’ beats world’s richest companies