मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईचे व्यापारी मनसुख हिरेन हत्ये प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA)अनेक प्रकारे तपास केला आहे. त्या तपासात अनेक वेगवेगळे गूढ समोर येत आहेत. आता मात्र NIA ला हिरेन हत्ये प्रकरणी निलंबित एपीआय सचिन वाझेचा मित्र विनायक शिंदे यांच्या घरातून एक डायरी सापडली आहे. या डायरीवरून हिरेन हत्येचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दहशतवाद विरोधी पथकानेही (ATS) मुंबई पोलीस मुख्यालयातील CCTV तपास केल्यास हिरेन हत्या आणि अंबानी यांच्या निवास्थानी स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
जर मुंबई पोलिसांनी योग्य सहकार्य केले असते. हिरेन हत्येचा उलगडा याआधीच झाला असता. ATS मधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. परंतु मुंबई पोलीस मुख्यालयाकडून आम्हाला CCTV फुटेज तपासण्याची परवानगी दिली नाही. त्यासाठी आम्ही माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना ४ पत्रही पाठवली होती, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रत्युत्तर आले नाही. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले. असे ATS च्या सूत्राकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ATS ने अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांचा तपास करताना २५ फेब्रुवारीच्या ४५ दिवस आधीचे आणि घटनेच्या नंतरचे CCTV फुटेज तपासासाठी मागितले होते, अँटेलिया बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली जी स्कोर्पिओ कार आढळली होती, ती १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान मुंबई पोलीस मुख्यालयात आणली होती अशी माहिती ATS ला मिळाली होती. त्यामुळे CCTV फुटेज तपासल्यानंतर याबाबत स्पष्ट होण्याची शक्यता होती. परंतु CCTV फुटेज तपासण्याचे आदेश ATS ला मिळाले नाहीत असे समजते. या दरम्यान, मुंबईत जवळपास १४०० बियरबार आणि अवैध धंदे आहेत, ज्यांच्याकडून महिन्याला २ लाख रुपये कमाई म्हणून महिन्याला २८ कोटीं वसूल होत होते, ही रक्कम पीआय पातळीपासून आयुक्त स्तरापर्यंत पोहचवली जात होती असे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी दावा केला.
दरम्यान, सचिन वाझे यांचे सहकारी विनायक शिंदे याच्या घरी जी डायरी सापडली त्यात वसुलीबाबत माहिती आहे, यात ३० पब आणि बारचे नाव, पत्ता आणि त्यांच्याकडून येणारी रक्कम किती याचा उल्लेख आहे, सचिन वाझेने ही जबाबदारी विनायक शिंदेला सोपवली होती. याशिवाय काही पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यवसायांचे नाव आणि पत्ते आहेत. असे NIA कडून सांगितले आहे. तसेच, प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये वसूल करून वाझेंकडे पोहचवायचे होते, पोलीस ज्यावेळी कोणत्याही बियर बार, अवैध व्यवसायावर छापा टाकत होते, तेव्हा वाझेचा फोन यायचा आणि अटक केलेल्यांना सोडायला सांगितलं जायचं. सचिन वाझेकडे अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांकडून लाखो रुपये सिक्युरिटी डीपॉझिट घेण्याचा नियम जगजाहीर होता. यात क्रिकेट बुकीपासून अनेक व्यवसायांचा समावेश होता. अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार सांगण्यात आले आहे.