उस्मानाबाद बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. तानाजी सावंत यांना आता उस्मानाबादचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीच त्यांचे पोस्टर जिल्ह्यात झळकत होते.
शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते प्रा. तानाजी सावंत यांना कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच त्यांना कॅबिनेट मंत्री पदावर नियुक्त करण्यात आले. त्यांच्याकडे जलसंधारण मंत्री पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. गेले साडेचार वर्षे उस्मानाबादला बाहेरून आलेले नेतेच पालकमंत्री म्हणून लाभले होते. सर्वात आधी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्याकडे पालकमंत्री पद सोपविण्यात आले होते. त्यांचा ग्रामीण भागाशी तसा काही संबंध नव्हता. तर त्यांनी कमी वेळ दिल्याने जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये आपुलकीचे संबंध निर्माण झाले नाहीत. त्यानंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पालकमंत्री पद सोपविण्यात आले होते. त्यांनाही वर्षभरात हटविण्यात आले. तर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची पालकमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. परंतु त्याना जिल्ह्यासाठी फारसा वेळ देता न आल्याने तानाजी सावंत यांचा पर्याय शिल्लक होता.
जिल्ह्याला बाहेरचे पालकमंत्री लाभल्याने त्यांचा दौरा फार कमी व्हायचा. त्यामुळे नियजोन समितीची बैठक असती, किंवा ध्वजवंदनाचा कार्यक्रम असता तरच नेते तिकडे फिरकायचे. त्यामुळे जिल्ह्यातील सावंत यांच्या रुपाने पुर्णवेळ पालकमंत्री मिळाला आहे.