पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – दहावी वर्गात शिक्षण घेत असताना झालेल्या मैत्रीतून लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तरुणाने बलात्कार केला. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला असून तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आकाश अशोक कदम (वय १९, रा. घोरवडे स्टेशन, तळेगाव दाभाडे) असे या तरुणाचे नाव आहे.
या मुलीच्या आईने तळेगाव दाभाडे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी २०१९ मध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना आकाश कदम याच्याबरोबर तिची मैत्री झाली. त्यानंतर त्यांचेमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तिला आपण लग्न करणार्या असल्याचे आमिष दाखवून तिला २८ नोव्हेंबर २०२० रोजी स्वत:च्या घरी नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. ती ११ आठवडे ६ दिवसांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला असून पोलिसांनी कदम याला अटक केली आहे.