पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर मागील एक वर्षापासून राज्यात ऑनलाईन शिक्षण (Online learning) सुरु आहे. परंतु फी साठी राज्यातील महाविद्यालयांकडून (colleges) विद्यार्थ्यांना (Student) वेठीस धरले जात आहे. फी (Fees) साठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करवी. तसेच चालू शैक्षणिक वर्षाची फी (Fee academic year)कमी करावी, अशी मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली आहे. युवक क्रांती दलाच्या वतीने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने (Dr. Dhanraj Mane) यांना निवेदन देण्यात आले.
काय म्हटले निवेदनात ?
राज्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.
संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले आहे.
उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाले आहेत.
बऱ्याच पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. शेतीतील उत्पन्न कमी झाले आहे.
अशातच मागील एक वर्षापासून विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने चालू आहे.
विद्यार्थी एकही दिवस कॉलेजला गेला नाही.
कोणत्याही साधनसामुग्रीचा वापर केला नाही.
परंतु महाविद्यालयाकडून संपूर्ण शैक्षणिक वर्षाची फि (Fee academic year) आकारली जात आहे.
वेगवेगळे शुक्ल आकारले जातेय
विद्यार्थी एक दिवसही कॉलेजला गेला नाही.
असे असताना महाविद्यालयाकडून मेन्टन्स फी, लॅबररी फी, जिम फी, कॉम्प्युटर लॅब फी, गणवेश फी, स्टडी मटेरियल फी, स्टेशनरी फी, इंटरनेट चार्जेस, फिल्ड वर्क, व्हेईकल चार्जेस, अशा प्रकारचे वेगवेगळे शुक्ल आकारले जात आहेत.
फी साठी विद्यार्थ्यांवर दबाव
विद्यार्थ्यांनी फी भरावी यासाठी महाविद्यालयाकडून दबाव टाकला जात आहे.
फी न भरल्यास फॉर्म इनवर्ड करुन घेणार नाही किंवा इंटरनल परीक्षेला बसू देणार नाही.
अशी धमकी वजा भाषेचा वापर केला जात आहे.
विद्यापीठाचे फॉर्म इनवर्ड करण्याबाबतचे परिपत्रक असून देखील याबाबत महाविद्यालये विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत आहेत.
या संदर्भात आपण तातडीने लक्ष घालावे.
महाविद्यालयांवर कारवाई करावी
विद्यार्थ्यांवर दबाव टाकून फी वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी.
तसेच विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षातली फी कमी करावी.
अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जाबुवंत मनोहर, शहराध्यक्ष सचिन पांडुळे, विद्यार्थी प्रतिनिधी जुबेर चकोली यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कृपया हे देखील वाचा:
New York Times, CNN यासह 19 आंतरराष्ट्रीय वेबसाईटला जगभरात Error, ओपनच होत नाहीत
18 जणांचा आगीत होरपळून मृत्यू; कंपनी मालक निकुंज शहाविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
मर्सिडीजने सादर केली सर्वात शानदार कार, किंमत 2.60 कोटी रुपये
राज्यात 28 मेपर्यंत 5126 लोकांना म्युकरमायकोसिसची लागण
मालदिवला ‘या’ पध्दतीनं मदत करत भारताचा पाकिस्तानला मोठा दणका