अहमदनगर न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Tahsildar Jyoti Deore Audio Clip | पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्यांच्या या व्हायरल झालेल्या क्लिपमुळे (Tahsildar Jyoti Deore Audio Clip) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यासह राज्यात पूर्ण खळबळ उडाली आहे. याअगोदर अमरावती जिल्ह्याच्या वनाधिकारी दिपाली चव्हाण (Deepali Chavan) यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावरून अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Ahmednagar Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी चौकशी समिती नेमल्याचे समोर आले आहे. याद्वारे त्यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या प्रकरणी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी चौकशी समिती नेमली असून या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल या अध्यक्ष आहेत.
तसेच, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील (Deputy Collector Urmila Patil) आणि तहसीलदार वैशाली आव्हाड (Tehsildar Vaishali Awhad) या चौकशी समितीच्या सदस्य आहेत.
दरम्यान, या प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना विनंती करत एक पत्र लिहिले आहे.
काय म्हणाले फडणवीस?
‘ज्योती देवरे यांनी 11 मिनिटांची एक ऑडिओ क्लिप (Audio clip viral) जारी करुन अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केले आहेत.
लसीकरणावरुन काही कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे, महिला कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त झाल्या आहेत.
‘थेट दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून मी सुद्धा तुझ्याकडे येतेय, हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे.
एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण
करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकार्याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे.
‘कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा दबावात काम करीत असताना त्यांना आणखी नाहक त्रास होणार नाही.
याची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे.
माझी आपल्याला विनंती आहे की, आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा.
या महिला अधिकार्याला आपण स्वत: बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी
आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तत्काळ त्यावर तोडगा काढून त्या अधिकार्याला न्याय द्यावा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकार्याची इतकी अवहेलना होऊ नये.
हीच कळकळीची विनंती, असं पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
Web Title : Tahsildar Jyoti Deore Audio Clip | ahmednagar parner tahasildar jyoti deore audio clip viral case collector order inquiry
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update