बहुजननामा ऑनलाइन टीम – टीम इंडिया वर्ल्डकपपूर्वी (T20 World Cup 2022) दोन सराव सामने खेळणार आहे. त्यातील एक सराव सामना काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत (Pakistan) 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याअगोदर भारत न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) आणखी एक सराव सामना खेळणार आहे. या वर्ल्डकपसाठी (T20 World Cup 2022) टीम इंडिया 17 दिवस आधीच ऑस्ट्रेलियात दाखल झाली होती. मात्र टीम इंडिया 17 दिवस आधी ऑस्ट्रेलियात का पोहोचली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या सगळ्यांवर टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) उत्तर दिले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाला हार्दिक पंड्या?
बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात हार्दिक पंड्याने टीमच्या तयारीपासून ऑस्ट्रेलियात पोहोचण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. हार्दिकनं या व्हिडीओत म्हटले आहे कि, ‘आम्ही वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2022) 17 दिवस आधीच ऑस्ट्रेलियात दाखल झालो. त्याचं कारण हे की इथल्या वातावरणाची आम्हाला सवय व्हावी. त्यासाठी आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत. तुम्ही गोलंदाज असो वा फलंदाज, तुम्ही एकाद्या ठिकाणी जितका जास्त वेळ घालवता तितका तुम्हाला खेळताना फायदा होतो.’
https://twitter.com/BCCI/status/1581971890461380612
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बुधवारी दुसरा सराव सामना
टीम इंडिया बुधवारी आपला दुसरा सराव सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.
आज झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव करत चांगली सुरुवात केली.
या सामन्यात हार्दिक पांड्याला फार काही कमाल दाखवता आली नाही.
मात्र यंदाच्या वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाला हार्दिक पांड्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
Web Title :- T20 World Cup 2022 | hardik pandya explain why team india came in australi 17 days early sport news
हे देखील वाचा :
Pune Crime | भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार
Rohit Pawar | पवार कुटुंबात देखील फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव, आ. रोहीत पवारांचा मोठा दावा
MP Sanjay Raut | संजय राऊत यांना जामीन नाहीच; सुनावणी पुढे ढकलली