नवी दिल्ली वृत्तसंस्था : दिल्लीच्या जीके-२ क्षेत्रातील एका खाजगी विद्यालयातील पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. शाळेच्या सफाई कामगारानेच हे अश्लील कृत्य केले आहे. आरोपीचे नाव पीचा मुथू (४५) असून तो कालकाजी येथील सुधार कॅम्प मधील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ ऑगस्ट रोजी मुलीच्या आईने यासंबंधित तक्रार दाखल केली. आपल्या मुलीवर मुथू याने शौचालयात लैगिक अत्याचार केले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे , पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. आरोपी विरोधात पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा विद्यालयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी हा पीडित मुलीच्या मागे – मागे शौचालयात जाताना दिसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा गेले २० वर्ष त्या शाळेत काम करत आहे. मुलीने आरोपीची ओळख पटवून दिली असून आरोपी आता अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज देखील जप्त करण्यात आले आहे.