नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल या आता विवाहित राहिल्या नसून त्यांनी त्यांचे पती नवीन जयसिंह यांच्यापासून घटस्फोट घेतला आहे. त्यांनी स्वतःच ही माहिती आपल्या ट्विटर हँडलवरून बुधवारी दिली असून स्वाती यांनी त्यांच्या राजकुमाराच्या गोष्टींचे दिवस संपले असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, अनेकदा शानदार लोकही एकत्र राहू शकत नाहीत. तसेच त्या आपल्या पतीची खूप आठवण करतील, असेही त्यांनी म्हटले.
‘सगळ्यात दुःखद क्षण तर तो असतो जेव्हा तुमची कहाणी संपते. माझा आणि नवीनचा घटस्फोट झाला आहे. कधी – कधी खूप चांगली लोकंही एकत्र राहू शकत नाहीत. मी नेहमी त्याची आठवण करेल. मी देवाला प्राथर्ना करते की, आम्ही आणि आमच्या सारख्या इतर लोकांना या दुःखापासून सावरायची शक्ती दे,’ असे स्वाती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/SwatiJaiHind/status/1229986737331437568
स्वाती यांचे पती ‘आप’शी जोडलेले असून २०१५ साली दिल्लीमध्ये ‘आप’चे सरकार आल्यावर स्वाती यांना दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते. स्वाती या त्यांच्या कामाला घेऊन चर्चेत असतात. लहान मुलींचा बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी करत मागच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये त्यांनी आमरण उपोषण केले होते. पण काही दिवसांनंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.