शाहजहांपूर : वृत्तसंस्था – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप मान्य केले आहेत. या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीचे प्रमुख नवीन अरोरा म्हणाले, “स्वामी चिन्मयानंद यांनी बॉडी मसाज आणि लैंगिक शोषणासहित त्यांच्यावरील सर्व आरोप मान्य केले आहेत.
स्वामी चिन्मयानंद यांना केलेल्या कृत्याची लाज वाटतेय
नवीन अरोरा म्हणाले, “या प्रकरणातील सर्व पुराव्यांचा तपास सुरु आहे. मला जास्त काही बोलायचं नाही. कारण ते(चिन्मयानंद) आपल्या कृत्यांबद्दल दिलगीर आहेत. त्यांना आपल्या कृत्याची लाज वाटत आहे.”
चिन्मयानंद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरच्या स्थानिक न्यायालयाने लैंगिक शोषणातील आरोपी चिन्मयानंद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी(दि 20 सप्टेंबर) सकाळी चिन्मयानंद यांना एसआयटीने अटक केली होती. त्यांच्याच कॉलेजमधील लॉची विद्यार्थिनी आणि तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. मुमुक्षु या स्वामींच्या आश्रमातूनच त्यांना अटक केली होती.
एसआयटीने चिन्मयानंद यांना मुमुक्षु आश्रमातील दिव्य धाममधून अटक केल्यानंतर शाहजहांपूरच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेलं होतं. चिन्मयानंद याच्या वकिल पूजा सिंह यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “एसआयटीची टीम मोठ्या संख्येतील पोलिस दलासह दिव्य धाम येथे पोहोचली आणि चिन्मयानंदला अटक केली.”