बहुजननामा ऑनलाइन : दिल्ली च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सुषमा या भाजपच्या निष्ठावंत नेत्या होत्या. सोशल मीडिया वर देखील त्या खूप ऍक्टिव्ह होत्या. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांना लाखो लोकांनी श्रद्धांजली वाजली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
परराष्ट्र मंत्री पदाचा कार्यभार पाहत असताना त्यांनी खूप लोकांची मदत केली. परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप आणण्याचे काम त्यांनी अत्यंत चोखपने बजावले. त्यात भारता बाहेर जाण्याच्या वीजा संदर्भातील हि प्रश्न मार्गी लावले.
एका वेबसाईट ने दिलेल्या माहितीनुसार २०१८ च्या ऍफिडेव्हिट नुसार, सुषमा स्वराज यांच्याकडे ३२ कोटी रुपये इतकी संपत्ती आहे मिळालेल्या माहितीनुसार सुषमा आणि त्यांच्या पतीकडे १९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ज्यामध्ये १७ करोड एफडीआर मधील आहे. त्या दोघांच्या सेविंग अकाउंटवर ३० लाख रुपये आहे. सुषमा यांच्याकडे स्वतःची अशी कोणती गाडी नाही , परंतु त्यांच्या नवऱ्याकडे मर्सडिजचे २०१७ चे मॉडेल आहे.
सुषमा यांना सोन्या -चांदीची हौस होती. त्यांच्याकडे २९लाख ३४ हजार रुपयाची आभूषणे आहेत. सुषमा यांच्यानावे हरियाणा मधील पलवण मध्ये शेतजमीन आहे. जिची किम्मत ९८ लाख रुपये आहे. दिल्ली मध्ये आलिशान ३ बीएचके आहे , तसेच मुंबई आणि दिल्ली मध्ये फ्लॅट देखील आहेत. या सर्वांची किंमत जवळपास १० कोटी इतकी आहे.त्यांच्यानंतर त्यांची संपूर्ण संपत्ती हि त्यांच्या पतीच्या नावे होणार आहे.