Sushma Andhare | अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनावरुन सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या- ‘सरकार उलथवून टाकण्यासाठीच…’
जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनावरुन गंभीर आरोप केले आहेत. सरकार उलथवून टाकण्यासाठीच अण्णा हजारे यांनी जनलोकपाल आंदोलन (Jan Lokpal Agitation) केल्याचा आरोप सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. तेव्हा आंदोलन करणारे अण्णा हजारे (Anna Hazare) आज एवढे प्रश्न आहेत, पेच निर्माण होत आहेत, पण त्यावर चकार शब्द बोलत नाहीत, असं म्हणत अंधारे यांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला. महाप्रबोधन यात्रेसाठी (Mahaprabodhan Yatra) त्या जळगाव मध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, हो, अण्णा हजारेंमुळेच भाजप (BJP) सत्तेत आली. त्याबाबत मी शास्त्रशुद्ध मांडणी केलीय. अण्णा हजारे लोकपालची जी मांडणी करतात ती मागणीच मुळात संवैधानिक चौकटीच्या बाहेरची आहे. आपल्याकडील संसदीय लोकशाही (Parliamentary Democracy) मोडीत काढून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचाच तो एक प्रयत्न होता. त्यातील त्रुटी कधीच दाखवण्याचा प्रयत्न झाला नाही.
त्या पुढे म्हणाल्या, कायदे मंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ हे तिघे विभक्त असले पाहिजे ही मूळ चौकट आहे. जेव्हा या तिघांच्या वर लोकपाल बसवला जातो तेव्हा संवैधानिक चौकट मोडण्याचाच प्रयत्न होतो. माणसात निवडपणा किती असतो, तेच अण्णा हजारे आज एवढे प्रश्न उभे राहत आहेत, पेच निर्माण होत आहेत, पण त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनावर निशाणा साधताना अंधारे म्हणाल्या,
अण्णा हजारेंचं लोकपाल आंदोलन केवळ इथलं एक सरकार उलथवून लावायचं,
लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करायची आणि एक लाट तयार करायची यासाठीच होतं.
लोकपाल आंदोलनातील त्रुटी कधीच दाखवल्या गेल्या नाहीत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Sushma Andhare | sushma andhare serious allegations on anna hazare janlokpal andolan and bjp
हे देखील वाचा :
Pune Crime | वीज खंडीत करण्याची भिती दाखवून महिलेला घातला 1 लाखांचा गंडा, बाणेर येथील घटना
Pune Crime | 5 पट पैसे परत केल्यानंतरही घरात शिरुन धमकाविणारा सावकार नागराज उर्फ नागेश नायकोडी अटकेत



Comments are closed.