Sushma Andhare On Devendra Fadnavis | ‘पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..?’, विनोद तावडेंच्या विरार कॅश कांड प्रकरणावरून शिवसेना ठाकरे नेत्यांचा घणाघात

मुंबई: Sushma Andhare On Devendra Fadnavis | विरारमधील विवांता हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी ५ कोटी वाट्ल्याचा गंभीर आरोप होत आहे (Virar Cash Case). व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पैशांचे बंडल दिसत आहेत. बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) अध्यक्ष हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा प्रकार समोर आणला आहे. त्यानंतर आता आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी विनोद तावडे यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हितेंद्र ठाकूर यांनी मोठा गौप्यस्फोट करत भाजपमधील एका मित्रानेच टीप दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता तावडेंचा ठरवून गेम केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हाच धागा पकडत शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट फडणवीस यांचे नाव घेतले आहे.
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला. पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..? असा सवाल ट्विटमधून करत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर बोलताना, गृहखात्याने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. विनोद तावडे यांचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चांगले संबंध असल्याने भविष्यात ते डोईजड होतील या भीतीमधूनच ही कारवाई करण्यात आली. त्यांना या प्रकरणामध्ये पद्धतशीरपणे अडकवण्यात आले आहे. एका बहुजन नेत्याला संपवण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Comments are closed.