Sushma Andhare On Amit Shah-Devendra Fadnavis | “फडणवीस हेच फेक नरेटिव्हचे सर्वात मोठे केंद्र” तर शहांच्या टीकेवर अंधारे म्हणाल्या, ” तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन…”

July 22, 2024

पुणे: Sushma Andhare On Amit Shah-Devendra Fadnavis | पुण्यात पार पडलेल्या भाजपच्या महाअधिवेशनाला (BJP State Executive Body’s convention in Balewadi Pune) संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका करत निशाणा साधला होता. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ” देवेंद्र फडणवीस हेच फेक नरेटिव्हचे सर्वात मोठे केंद्र असल्यासारखे वाटतात, अशी टिप्पणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

अंधारे पुढे म्हणाल्या, “आम्हाला अमित शहा यांच्यावर बोलायचे नाही. तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची गरज नाही. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत? याचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याची गरज वाटत नाही. आमचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपाराकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही. ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट देऊ नये, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

तसेच “शंकराचार्य मातोश्रीवर आल्यापासून तुम्हाला पोटशुल उठलं आहे. तुम्हाला आता मुद्दे मिळत नाहीत. अदानींच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली तेव्हा तुमची आर्थिक रसद तुटते का? असं वाटायला लागलं म्हणून औरंगजेब फॅन क्लब अशी भाषणं करत आहात, तुमचा स्तर किती खाली गेला आहे”, असेही सुषमा अंधारे यांनी म्हंटले.