बहुजननामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय वेगवेगळ्या अँगलनं करत आहे. आता या केसबाबत एक नवीन बाब समोर आली आहे. काहीतरी गडबड असण्याकडे ही बाब इशारा करत आहे. सीबीआयच्या सूत्रांनुसार, सुशांतनं 13 जूनच्या दुपारपासूनच फोन आणि मेसेजला रिप्लाय दिला नाही. सुशांतची बहिण मीतूने देखील हे आधी सांगितलं होतं की, 14 जूनला सकाळी सुशांतनं फोन उचलला नाही.
13 जूनला लवकर बंद झाल्या लाईट्स
एका इंग्रजी रिपोर्टनुसार, सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, 13 जून पासूनच सुशांत मेसेज, कॉल आणि चॅटला उत्तर देत नव्हता. सुशांतच्या शेजाऱ्यांनी सांगितलं होतं की, 13 जूनला त्याच्या घरातील लाईट्स लवकर बंद झाल्या होत्या. त्याच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्येही त्याच्या मृत्यूची वेळ नोदंवली नसल्यानं यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
कुकच्या बोलण्यात आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये फरक
सुशांतचा कुक नीरजनं सांगितलं की, “मृत्यूच्या दिवशी सकाळी सुशांतला नारळाचं पाणी देण्यात आलं होतं. परंतु लेटेस्ट पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार सुशांतचं ब्लॅडर रिकामं होतं. असंही सांगितलं जात आहे की, सुशांतचा टॅलेंट मॅनेजर त्याच्यासोबत 13 जूनला दुपारी 2.22 वाजता बोलला होता. दीपेश सावंतनं 14 जून बद्दल बोलताना सांगितलं की, त्याला शंका आली आणि तो 10.30 वाजता पासून ते 1 वाजेपर्यंत सुशांतचा दरवाजा वाजवत होता. तसेच 10.30 वाजता दीपेशनं जाहिरातीसंबंधीत एका मॅटरविषयी एकाला मेसेज केला होता.
सीबीआय मेडिकल बोर्डमीटींग
सीबीआयानं सुशांतच्या मृत्यूचा शोध लावण्यासठी एम्सच्या मेडिकल टीमची मदत घेतली. रिपोर्टनुसार, या प्रकरणी महत्त्वाची मीटींग झाली. दुसरीकडं एनसीबी या केसमध्ये ड्रग्स अँगलनं तपास करत आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंतसहित काही ड्रग पॅडलर्सना अटक झाली आहे.