मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मृत्यू प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.
सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणार्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश कोर्टाने दिले. त्याचप्रमाणे या तपासात सीबीआयला मदत करण्याचे आदेश कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासंबंधी विचारणा केली. मात्र कोर्टाने त्यासाठी नकार दिला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुशांतसिंहच्या आत्महत्येबाबत सुरु असलेल्या राजकारणाला कोर्टाच्या निणर्यामुळे लगाम बसणार आहे. यासंदर्भात लवकर कागदपत्रो सीबीआयच्या हाती दिली जाणार आहेत.