बहुजननामा ऑनलाईन– अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला सध्या नवीन वळण आलं आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण प्रियांका सिंह आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमारसह अनेक लोकांच्या विरोधात खोटं मेडिकल प्रिस्क्रिप्शन बनवल्याबद्दल खटला दाखल केला आहे. रियाने एनडीपीएस ऍक्ट आणि टेली मिडीसीन प्रॅक्टिस गाईडलाईन्स 2020 च्या विरोधात खटला दाखल केला आहे.
रिया चक्रावर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांच्या मते, 8 जूनला सुशांतची बहीण प्रियांका सिंहने राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडून घेऊन खोटं मेडिकल प्रिस्क्रिप्शन पाठवलं होतं. त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये अशा औषधांचा समावेश होता जे एनडीपीएस ऍक्ट मध्ये येतात.
प्रिस्क्रिप्शन वरून झालं होतं भांडण
रिया चक्रावर्तीचे वकील सतीश मानेशिंदेनी सांगितलं, प्रियांका सिंहच्या याच प्रिस्क्रिप्शन वरून सुशांत आणि रिया या दोघांमध्ये भांडण झालं होतं. सतीश मानेशिंदेनी म्हणाले, ‘त्याची बहीण प्रियांकाने हा मेसेज दिल्लीवरून पाठवला होता की हे प्रिस्क्रिप्शन आहे. प्रिस्क्रिप्शन पाहिल्यानंतर रियाला समजलं की हे प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांनी सुशांतला न तपासताच पाठवलं आहे. त्याबद्दल त्यांच्यात बोलणं झालं आणि रिया म्हणाली की मुंबई मध्ये आपण डॉक्टरांना भेटून आलो आहोत त्यांनी दिलेलं औषध घेत नाही मग हे प्रियांकाने पाठवलेल्या प्रिस्क्रिप्शनमधील औषधंही घेऊ नको.’
मानेशिंदे पुढे म्हणाले, ‘सुशांतने सांगितलं की माझ्या बहिनेने दिलेले मेडिसिन मी घेणार. त्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण झालं. तेव्हा सुशांत रियाला म्हणाला तू बॅग घेऊन इथून निघून जा. आता समजतंय की जे प्रिस्क्रिप्शन 12.30 ते 12.40 वाजता पाठवलं होतं ते खोटं होतं. कारण त्यात लिहिलं आहे की सुशांत ओपीडी पेशंट आहे. सुशांत मुंबई मध्ये होता मग तो ओपीडी पेशंट कसा असू शकतो.’
रिया चक्रावर्तीचे वकील सतीश मानेशिंदेनी म्हणाले, ‘त्या डॉक्टरने कधी सुशांतला तपासलं नव्हतं. ज्या डॉक्टरने हे प्रिस्क्रिप्शन दिलं होतं तो कार्डिओलॉजिस्ट आहे तो साइकियाट्रीस्ट नाही. अशा डॉक्टरांचं तर लायसन्स रद्द केलं पाहिजे. नकली कागदपत्र आहेत आणि कुटुंबीय देखील यात सहभागी आहेत.’
सुशांतच्या वडिलांच्या वकिलाने आधीच केला खुलासा
यावर सुशांतच्या वडिलांच्या वकिलाने आधीच खुलासा केला आहे. ते म्हणाले, ‘8 तारखेला सुशांत जेव्हा घाबरला तेव्हा त्याने आपल्या बहिणीला कॉल केला होता. त्याची बहीण जे मेडिसिन घाबरल्यासारखं झाल्यावर खात होती तेच मेडिसिन तिनं सुशांतला खायला सांगितलं. जेव्हा त्याने सांगितलं की बिना प्रिस्क्रिप्शन मेडिसिन मिळणार नाही तेव्हा तिने हे ओरल प्रिस्क्रिप्शन करून पाठवलं.’