नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई सुपरकिंग्सला आयपीएल 2020 मध्ये एकदम मोठा झटका बसला आहे. चेन्नई सुपरकिंग्समधील आघाडीचा फलंदाज सुरेश रैनानं आगामी आयपीएलमधून माघार घेतली आहे. चेन्नई सुपरकिंग्ससाठी सर्वात जास्त आणि आयपीएलच्या इतिहासात नंबर 2 च्या सर्वात जास्त धावा करणारा सुरेश रैना खासगी कारणामुळं भारतात परतला आहे. सीएसकेचे सीईओ यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. ते म्हणतात, सुरेश रैना खासगी कारणांमुळं भारतात परतला आहे आणि तो आगामी आयपीएल सीझनसाठी उपलब्ध होणार नाही. चेन्नई सुपरकिंग्स सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबासोबत आहे.
Suresh Raina has returned to India for personal reasons and will be unavailable for the remainder of the IPL season. Chennai Super Kings offers complete support to Suresh and his family during this time.
KS Viswanathan
CEO— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 29, 2020