Supriya Sule On Yugendra Pawar | युगेंद्र पवार बारामतीचे नवे दादा? सुप्रिया सुळेंचे स्पष्ट शब्दात भाष्य

June 20, 2024

बारामती: Supriya Sule On Yugendra Pawar | लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभी अजित पवारांनी (Ajit Pawar) आपले काका शरद पवारांची साथ सोडत महायुतीत (Mahayuti) प्रवेश करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) अशी लढत झाली. यामध्ये सुप्रिया सुळे विजयी झाल्या तर सुनेत्रा पवारांना पराभव स्वीकारावा लागला.

यामध्ये सुप्रिया सुळेंना अजित पवारांच्या मतदारसंघातून ५० हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2024) अजित पवारांना जड जाणार का ? अशी एक कुजबुज सुरु झालेली आहे. दरम्यान या मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांचे नाव चर्चेत आहे. युगेंद्र पवार बारामतीचे नवे ‘दादा’ आहेत का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिले आहे.

“युगेंद्र पवार हा चार वर्षापासून बारामतीत फिरतोय. विद्या प्रतिष्ठानमध्ये चांगलं काम आहे. स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवतोय. लोकांची कामे करतोय. आघाडी नेते काय ते निर्णय घेतील. तो फिरतोय म्हणून त्याला उमेदवार दिली जाईल किंवा नाही, याची चर्चा फार लवकर होत आहे असं मला वाटतं. बघूया पुढे काय होतं ते”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. बारामती आणि परिसरातील शेतकरी मेळाव्यांना ते हजेरी लावत आहेत. महाविकास आघाडी म्हणून अनेक मुद्द्यांवर आम्ही काम करत आहोत. अनेक चांगले निर्णय घेतले पण गेल्या दोन अडीच वर्षात यांचे सरकार आल्यापासून कोणते चांगले निर्णय घेतले राज्यात, देशात?, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.