Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”
मुंबई : Supriya Sule On Ajit Pawar Video | आगामी विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) दोन ते तीन महिन्यांवर आल्याने सरकारकडून अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2024) मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळं सरकार (Mahayuti Govt) जुमल्यांचा पाऊस पाडत आहे असे भाष्य खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील अर्थसंकल्पावर केले आहे. अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून ‘महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश’ या मथळ्याखाली एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींचा उल्लेख केला. त्यासंदर्भात विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेवर त्यांनी वक्तव्य केले आहे. त्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” “सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे? याचा विचार सरकारने केला पाहिजे. ज्या प्रकारे सरकार कर्ज घेत आहे, निवडणूक समोर असल्याने सरकार फक्त जुमल्यांचा पाऊस पाडत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि पैसे वापरायचे, सत्तेत यायचे असे सुरु आहे. सरकारने गरीबांची मदत केली पाहिजे. पण किती कर्ज घ्यावे? आता बुलेट ट्रेन प्रोजेक्ट पाहा. बुलेट ट्रेन कोणीही मागितली नव्हती. या सर्वांचा विचार व्हायलाच पाहिजे. मला तरी हा अर्थसंकल्प पाहून काहीही आश्चर्य वाटलं नाही”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
अजित पवारांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही विधान केले होते त्याबाबत बोलताना सुळे पुढे म्हणाल्या, “अजित पवार यांच्यावरील भ्रष्ट्राचाराच्या आरोपावर महाविकास आघाडी उत्तर देऊ शकत नाही, तर महायुतीने उत्तर दिलं पाहिजे. कारण अजित पवार यांच्यावर आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनी अजित पवारांवर आरोप केले. त्यामुळे याचं उत्तर त्यांनाच विचारलं पाहिजे”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
Comments are closed.