नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबादममधील महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि जिवंत जाळल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ आरोपी पोलिस एन्काउंटरमध्ये ठार केले. या चकमकीवर मानवाधिकार आयोग आणि अनेक संघटनांनी प्रश्न विचारला होता. गुरुवारी या प्रकरणात सुनावणी सुरू झाली तेव्हा सीजेआय बोबडे म्हणाले की, या चकमकीचे सत्य जाणून घेण्याचा लोकांना अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
हैदराबाद चकमकी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या तीन सदस्यीय समितीचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश व्ही. एस. सिरपूरकर हे असतील. पुढील आदेश येईपर्यंत अन्य कोणतेही कोर्ट किंवा प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
यापूर्वी चकमकी प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बोबडे म्हणाले की, आम्हाला त्याबाबत निष्पक्ष चौकशी हवी आहे. आपण पोलिसांविरोधात फौजदारी खटला चालवल्यास आम्ही कोणतेही आदेश जारी करणार नाही, असे ते म्हणाले. सीजेआय एसए बोबडे यांनी तेलंगणा सरकारतर्फे बाजू मांडणारे वकील मुकुल रोहतगी यांना सांगितले की आपण दोषी आहात असे आम्ही म्हणत नाही आहोत, आम्ही चौकशीचे आदेश देऊ आणि आपण त्यास सहकार्य करू.
सरन्यायाधीशांनी विचारले की आरोपी हे हिस्ट्रीशीटर आहेत का ? वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, तो कोणी नाही तो एक लॉरी चालक आणि क्लिनर होता आणि जेव्हा पोलिस त्यांना घटनास्थळी घेऊन जाण्याच्या तयारीत होते तेव्हा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमा झाला. म्हणून आम्ही (पोलिसांनी) त्यांना रात्री गुन्हेगारीच्या ठिकाणी आणले. आरोपींना हातकड्या लावण्यात आल्या नव्हत्या. तेथे त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावली आणि दगडफेक केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना ही थेट कारवाई करण्यात आली.