नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने गोगोई यांच्याविरोधात दाखल लैंगिक शोषण प्रकरणच बंद केले आहे. न्यायालयाने स्वत: या प्रकरणाचा तपास सुरु होता. त्यानंतर हा निर्णय घेतला गेला.
एका महिलेने माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी 2019 मध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा स्वत: तपास सुरु करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार तपासाचे आदेश देण्यात आले. हा गंभीर आरोप असल्याने सत्यता काय आहे, याकडे पाहणे गरजेचे आहे. जर आम्ही डोळेझाक केले तर देशाचा विश्वास तुटेल, असे म्हणणे न्यायालयाचे होते.
Supreme Court disposes off the suo motu proceedings against former CJI Ranjan Gogoi, against whom sexual harassment allegations were levelled in 2019. pic.twitter.com/N3xs3QbaWK
— ANI (@ANI) February 18, 2021
दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. के. पटनायक यांच्यामार्फत तपास सुरु करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयाने बंद केले. तसेच न्यायपालिकेविरोधात हे षडयंत्र असल्याचे सांगत ही फाईलच बंद करण्यात आली.
सरन्यायाधीश गोगोई यांना अडकविण्यात येतयं
माजी सरन्यायाधीश गोगोई यांना अडविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हे सर्व कॉर्पोरेटने केले होते, असा आरोप वकील उत्सव बैंस यांनी केला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्वत: सुनावणी केली होती.
राज्यसभेचे खासदार रंजन गोगाई
रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यांनी 2018 आणि 2019 या 13 महिन्यांच्या कालावधीत पदभार सांभाळला होता. सध्या रंजन गोगोई हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद नियुक्त राज्यसभा सदस्य आहेत.