Sunny Deol Tests Positive for COVID-19 : भाजपा खासदार आणि अभिनेता सनी देओलचा ‘कोरोना’ रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
कुल्लू : भाजपा खासदार आणि बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल कोरोना व्हायरसने संक्रमित आढळला आहे. तो हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात होता, जिथे त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सनी देओल स्वत: क्वारंटाइन झाला आहे आणि नियमांचे पालन करत आहे.
Bollywood actor and BJP MP from Gurdaspur Sunny Deol tests positive for #COVID19 in Himachal Pradesh’s Kullu district: State Health Secretary
— Press Trust of India (@PTI_News) December 1, 2020
सनी गुरदासपुर मतदार संघातून भाजपाचा खासदार आहे. सप्टेंबर महिन्यात तो गुरदासपुरमध्ये सुद्धा गेला होता जिथे त्याने कोविड-19 महामारी तसेच अन्य मुद्यांवर वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली होती. यासोबतच त्याने मध्यंतरी महामारीविरोधात जनजागृती केली होती.
सनी सुमारे 6 महिन्यानंतर गुरदासपुरमध्ये आला होता. येथे कोरोनाच्या कामकामाजाची पाहणी केल्यानंतर त्याने ट्विट केले होते की, कोरोनाबाबत लोकांना जागृत करणे आणि गुरदासपुरच्या कायदा सुव्यवस्थेसंबंधी एसएसपींसोबत सकारात्मक चर्चा झाली.
सनीवर नेहमी आरोप होत असतो की तो खासदार झाल्यानंतर संसदेत दिसत नाही, तसेच त्याच्या मतदार संघातून सुद्धा गायब झाला आहे. अनेकदा त्याच्या नावाची हरवल्याची पोस्टर सुद्धा मतदार संघात लावण्यात आली आहेत. यावर विरोधकांनी आपला रागसुद्धा जाहीर केला आहे.
Comments are closed.