पिंपरी बहुजननामा ऑनलाईन – ओबीसी समाजाला भेडसावणाऱ्या समस्या या विषयी सामाजिक संघटन उभारण्याबाबत चर्चा, विचार विनिमय करण्यासाठी पिंपरी चिंचवड ओबीसी संघर्ष समितीची बैठक रविवारी (दि.१४ जुलै) सायं.५ :३० वाजता हॉटेल गणेश, जमतानी चौक पिंपरी येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती ओबीसी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आनंदा कुदळे यांनी दिली आहे.
याबैठकीत ओबीसी संघर्ष समितीच्या मागील कामाचा आढावा घेतला जाणार असून ज्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्याबाबत चर्चा केली जाणार आहे. संघटन वाढविण्याबाबत चर्चा केली जाणार असून ते वाढवण्याबाबत काय प्रयत्न केले पाहिजे यावर काम केले जाणार आहे .समितीच्या कामकाजाविषयी कार्यकर्त्याचे मनोगत घेतले जाणार आहे.
ओबीसी समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष ओबीसी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आनंदा कुदळे यांनी केले आहे.