मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते एकमेकांवर सतत टीका करत आहेत. यासोबत ईडी (ED), आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या सर्व घटनांवरुन राज्यातील राजकीय (political) वातावरण चांगलेच तापले असताना भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या एकत्र विमान प्रवासाचे फोटो व्हायरल (Photo viral) होत आहे. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि पार्थ पवारांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Friendship Beyond Boundaries..!!@parthajitpawar pic.twitter.com/j0QzfXBoST
— Dr. Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) October 16, 2021
खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि पार्थ पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला. दोघांनीही जवळपास 40 मिनिटे एकत्र प्रवास केला. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. औरंगाबाद ते मुंबई (Aurangabad to Mumbai) या प्रवसानंतर सुजय विखे पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर दोघांचे विमानातला आणि विमानतळावरचे फोटो पोस्ट केले आहे. हे फोटो शेअर करत असताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, सर्व सीमांच्या पलिकडची मैत्री (Friendship Beyond Boundaries..!). आपल्या फेसबूक आणि ट्विटर अकाऊंटवरुन विखे यांनी हे फोटो शेअर केले आहेत.
राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतात. मात्र असे असले तरी दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची मैत्री हा एक वेगळा भाग असते. राजकीय विरोधक असले तरी दोन नेत्यामध्ये मैत्री असल्याची अनेक उदाहरण राज्यात आहेत. त्याचाच एक भाग सुजय विखे आणि पार्थ पवार यांच्याबाबतही आहे. सुजय विखे पाटील यांनी पार्थ पवारांसोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
Web Title : Sujay Vikhe Patil | bjp mp sujay vikhe patil and ncp leader ajit pawar son parth pawar travel in same plane photos goes viral on social media
- Sharad Pawar On Modi Government | शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका; म्हणाले – ‘सरकार पाडण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर’
- Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’; ‘बेनामी’चा होणार पर्दाफाश
- Masked Aadhaar Card |काय आहे Masked Aadhaar Card, काय आहेत याचे फायदे आणि कसे होते तयार, जाणून घ्या सविस्तर