सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्याने सर्वच पक्षातील उमेदवारांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. तसेच बहुजन वंचित आघाडीच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करण्यासाठी माझ्याकडे काही सिक्रेट फॉर्म्युले आहेत. आणि मी ते जाहीर करणार नाही. असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी सांगितले आहे. ते काल सोलापुरात पत्रकाराशी बोलत होते.
यावेळी सुजात आंबेडकर यांनी कॉंग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली. अॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोल्यासहित सोलापुरातूनही निवडणूक लढवणार आहेत. यासंदर्भात काँग्रेसने आम्हाला ‘बी’ टीम म्हणून हिणवणे किंवा अपप्रचार करणे बंद करावा. आंबेडकरांच्या प्रचारासाठी मी पुढील ३० दिवस सोलापूर मुक्कामी आहे. अशी माहिती प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी ‘माध्यमांशी’ बोलताना दिली. काँग्रेस ने वंचित बहुजन आघाडीचा अपप्रचार करणे थांबवावे. असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले.