पुणे : बहुजननामा ऑनलाईन – हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील (Tehsildar Trupti Kolte Patil) यांच्या वाहन चालकाने (Driver) राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. Suicide | Haveli Tehsildar Trupti Kolte Patil’s government driver committed suicide by hanging himself at his residence, suicide note …
अरुण मधुकर दीक्षित (वय 50 रा. जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात (Sanghavi Police Station) घटनेची नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षित हे हवेली तहसील कार्यालयात (Haveli Tehsil Office) शासकीय कार चालक (Government car driver) आहेत. सध्या हवेली तहसीलदार म्हणून तृप्ती कोलते पाटील या कार्यरत आहेत. या दरम्यान आज सायंकाळी दीक्षित यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, याबाबत तृप्ती कोलते पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी चालक दीक्षित यांना पित्ताचा त्रास होता. ते आजाराने त्रस्त होते. त्याने दुसरा ढोस घेतला होता, असे सांगितले आहे.. घटनास्थळी सांगवी पोलिसांनी धाव घेतली आहे. अधिक तपास सुरू आहे.
याबाबत सांगवी पोलिसांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून ते घरीच होते.
त्यांना पित्ताचा त्रास होता.
आज सायंकाळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास लावून आत्महत्या केली आहे.
त्यांच्याकडे सुसाईड नोट मिळालेली नाही. अधिक तपास सुरू आहे.
कृपया हे देखील वाचा:
Pune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय
बलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक
Gold-Silver Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीचे सुद्धा रेट घसरले, जाणून घ्या आजचा भाव
Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 284 रूग्ण ‘कोरोना’मुक्त
पीएफ अकाऊंटवर केवळ जास्त व्याज नव्हे, विमासुद्धा मिळतो; जाणून घ्या पीएफची संपूर्ण एबीसीडी