बहुजननामा ऑनलाइन टीम – शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक राजेश प्रकाश माळी यांना गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल(Sub-Inspector of Police Rajesh Mali) भारत सरकारचा आंतरिक सुरक्षा पदक पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते नुकताच बहाल करण्यात आले.
आता शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक राजेश प्रकाश माळी यांना त्यांनी यापूर्वी सन २०१५ ते २०१९ साली गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत यापुर्वी महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष सेवा पदक देऊन गौरविले होते. तर २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलिस अधिक्षक कार्यालय पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांना भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारे आंतरिक सुरक्षा पदक पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक उपस्थित होते. राजेश माळी यांना मिळालेल्या आंतरिक सेवा पदकाने त्यांचे शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांसह सर्व पोलिस कर्मचारी व अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले .