बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना महामारीच्या कचाट्यात(Sub-divisional) अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजा भागविणे दुरापास्त झाले असताना मुलांचे शिक्षणासाठी(Sub-divisional) आर्थिक तरतूद कुठून करावी या विवंचनेत पालक आहे अशावेळी समाजातील अनेक सामाजिक संस्था अथवा व्यक्ती पुढे येऊन आपापल्या परीने मदत करत आहेत. थेऊर येथील उद्योजक खंडू गावडे यांनी आपल्यावतीने परिसरात दहावी व बारावी इयत्तेत विशेष प्रावीण्यासह उत्तिर्ण झाले अशा विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले तसेच वर्षभर लागणारे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी विद्यार्थ्यांना सन्मानित केले यावेळी अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सिताराम लांडगे होते तसेच हवेली तालुका रिपाईचे अध्यक्ष मारुती कांबळे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट श्रीनिवास वाघ चिंतामणी विद्या मंदिरच्या प्राचार्या शोभा कोतवाल गणेश गावडे विकास तिखे मनिषा आखाडे सहदेव खंडागळे भुजंग खेंडकर दादा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी परिस्थितीची संधी ओळखून मार्गदर्शन घेऊन आपले कौशल्य दाखवले पाहिजे. सध्या स्पर्धेचे युग आहे यात स्वतःला सिध्द करण्याची प्रत्येकाला संधी आहे.कोरोनाच्या काळात अनेक बंधने आल्याने घरात बसूनच शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे तरीही घरातील जेष्ठांची मदत घेऊन अभ्यास पूर्ण करावा असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात सिताराम लांडगे यांनीही विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अडचणी येतात त्यावर कशी मात करावी याबद्दल मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन आनंद वैराट यांनी केले.