चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एका शाळेत महिला मुख्याध्यापकाने अमानवीय शिक्षा दिल्यामुळे १० वीच्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मुख्याध्यापकेने विद्यार्थ्यांना दीडशे उठा-बशा काढण्याची शिक्षा दिली असताना यामुळेच विद्यार्थ्यांच्या कमरेवर आणि पायाला सूज आली आहे. विद्यार्थ्यांचे शरीर पूर्णपणे सुजले असून असहनीय असा त्रास होत असल्यामुळे त्यांना उठण्या-बसण्यासाठी अडचण होत आहे. विद्यार्थ्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
चंद्रपूरपासून १०० किमी लांब चिमूर गावात समाज कल्याण विभागाकडून सरकारी शाळा चालवली जाते. या शाळेतील दहावीत शिकत असणाऱ्या ३८ विद्यार्थ्यांना शाळेतील मुख्याध्यापकांनी केवळ शाळेच्या असेम्ब्ली दरम्यान या विद्यार्थ्यांच्या चालण्याचा आवाज होत असल्याने असेम्ब्लीमध्ये अडथळे येत होते, म्हणून त्यांना ही अमानवीय शिक्षा दिली.
विद्यार्थ्यांना शाळेच्या इतर वर्गांच्या समोर नेऊन १५० उठा-बशा काढायला लावल्या. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा पूर्ण नाही केली तर प्रॅक्टिकलमध्ये मार्क मिळणार नाहीत, अशी धमकी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मजबूर होत शिक्षा पूर्ण केली.
१८ फेब्रुवारीला प्रॅक्टिकल असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्या दिवशी असेम्ब्ली सुरु असताना प्रॅक्टिकलची वही घेण्यासाठी आमच्या वर्गात गेलो. त्यादरम्यान राष्ट्रगीत सुरु होते. सगळ्या मुली उभ्या होत्या. जेव्हा प्राथर्ना सुरु झाली तेव्हा शाळा आणि हॉस्टेल एकाच बिल्डिंगमध्ये असल्यामुळे आमची प्रोजेक्ट घ्यायला दुसऱ्या मजल्यावर जात होतो. तेव्हा आमच्या बुटांचा आणि चप्पलचा आवाज आल्याने असेम्ब्ली डिस्टर्ब झाली, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर आम्हाला मुख्याध्यापकांनी आम्हाला शिक्षा दिली. प्रत्येक वर्गात ५०-५० उठा-बशा काढायला लावल्या. पहिले १०, मग २०, मग ३०. असे करत-करत मॅडमने जोपर्यंत थांबायला सांगत नाही तोपर्यंत उठा-बशा काढायला लावल्या. आम्ही मुलींनी १५० पेक्षा जास्त उठा-बशा काढायला सांगितल्या असताना मुली रडत होत्या, तरीही प्राचार्यांना काही फरक पडला नाही. त्यानंतर ते म्हणाले की, कोणतेही प्रॅक्टिकल होणार नसून प्रत्येकाला शून्य गुण मिळतील. दुसर्या दिवशी प्रत्येकाला खूप त्रास होऊ लागला, मग वरदान मॅडम आम्हाला दवाखान्यात घेऊन गेल्या. आम्ही 6 मुली दवाखान्यात गेलो.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या कमरेवर आणि पायावर सूज आली असून त्रास होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना चालण्या-फिरण्यास अडचण येत आहे. पूर्ण प्रकरण समजल्यावर डॉक्टरांनी पोलीस आणि शिक्षण विभागात तक्रार केली.
शाळेतून काही विद्यार्थी माझ्याकडे आले होते. एकूण सहा मुली होत्या. मॅडमने त्यांना शिक्षा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. मी जेव्हा त्यांची तपासणी केली, तेव्हा त्याचा पाठीचा भाग पूर्णपणे सूजला असून पायालाही सूज होती. त्या रडतच माझ्याकडे आल्या. मी त्यांना उपचार दिले आणि पोलिस व शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर थोड्याशा आरामानंतर त्याला परत पाठवून दिले, असेही डॉक्टरांनी सांगितले.