बहुजननामा ऑनलाईन टीम : AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी सध्या आपल्या डान्स स्टेपसाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल आहेत. निवडणुकीच्या रॅलीनंतर ते रंगमंचावर थिरकताना दिसले , त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. दरम्यान ते औरंगाबाद येथे प्रचारासाठी पोहोचले होते, तेथे भाषण संपल्यानंतर परत जाताना त्यांनी हे नृत्य सादर केले.
दरम्यान AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी सांगितले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९९३ च्या मुंबई दंगलीवरील श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवडणूक भाषणांमध्ये वादग्रस्त विषय आणि विशिष्ट वर्गाला संदेश पोहोचविण्यात हातभार लावल्याचा आरोप त्यांनी केला.
Maharashtra: AIMIM Chief Asaduddin Owaisi performs a dance step after the end of his rally at Paithan Gate in Aurangabad. (17.10.2019) pic.twitter.com/AldOABp2yd
— ANI (@ANI) October 18, 2019
येथे एका मोर्चाला संबोधित करताना अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पूर्वीच्या सरकारांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील पीडितांवर न्याय दिला नाही”. तसेच “खटले बंद आहेत, आरोपींना शिक्षा झाली आहे,” परंतु श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल मुंबई दंगलींवर लागू झाला नाही. पंतप्रधान मोदी यावर कधी काम करतील ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
Visit : bahujannama.com