बहुजननामा ऑनलाइन – अॅक्टर सुशांत सिंह राजपूतच्या(sushant singh rajput) 14 जूनला झालेल्या मृत्यूनंतर सुमारे 80 हजारपेक्षा जास्त विविध प्लॅटफॉर्मवर बनावट सोशल मीडिया अकाऊंट बनवण्यात आली, जेणेकरून सुरू असलेला मुंबई पोलिसांचा तपास आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करता येईल. मुंबई पोलीस कमिश्नरने सायबर सेलला सांगितले की,(sushant singh rajput) अशी प्रकरणे आयटी अॅक्ट अंतर्गत नोंदवून तपास करावा.
मुंबई पोलीसांच्या सायबर सेल युनिटने एक रिपोर्ट तयार केला आहे, ज्यामध्ये आढळले आहे की, पोस्ट सोशल मीडियाच्या व्यासपीठावर जगातील विविध देश जसे की – इटली, जपान, पोलंड, स्लोवेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्सवरून पोस्ट करण्यात आल्या आहेत.
सीनियर आयपीएस ऑफिसरने म्हटले, आम्ही परदेशी भाषेत पोस्ट्सची ओळख पटवली आहे, कारण त्यामध्ये हॅशटॅग – #justiceforsushant #sushantsinghrajput आणि #SSR वापरलेला आहे. आम्ही आणखी काही अकाऊंटची पडताळणी करण्याची प्रक्रिया करत आहोत.
मुंबईचे पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांनी म्हटले, हे कॅम्पेन अशावेळी आमचे मनोबल खच्ची करण्यासाठी चालवण्यात आले, जेव्हा कोरोना व्हायरसमुळे 84 पोलीस कर्मचार्यांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 6 हजारपेक्षा जास्त जवान कोरोना संक्रमित होते. हे जाणीवपूर्वक चालवण्यात आलेले कॅम्पेन होते. जेणेकरून मुंबई पोलिसांची प्रतिमा आणि तपास दोन्ही बिघडवता येईल.
मुंबई पोलीसांना असभ्य भाषा वापरण्यात आली, अनेक सोशल मीडियावर बनावट अकाऊंट बनवण्यात आली होती. आमचा सायबर सेल याचा सखोल तपास करत आहे. जे कायद्याचे उल्लंघन करताना आढळतील त्यांच्यावर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टच्या कलमांखाली कठोर कारवाई केली जाईल.
एम्सकडून मर्डरच्या शक्यता फेटाळून जारी करण्यात आलेल्या रिपोर्टवर मुंबई पोलीस कमिश्नर म्हणाले, आम्ही अतिशय काटेकोर तपास केला होतो. सीबीआईने एम्सच्या पॅनलचे गठण केले होते, ज्यांनी आमचा तपास आणि कूपर हॉस्पीटलकडून मिळालेले पुरावे आणि फॉरेन्सिक लॅबोरॅटरीला योग्य ठरवले आहे. काही लोकांना सोडले तर कुणीही आमच्या तपासाशी संबंधित नव्हते. तर अनेकजण अजूनही आमच्या तपासावर टिका करत आहेत.