नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी म्हणजे आज नवीन संसद भवनची पायाभरणी आणि भूमीपूजन करतील. या सोहळ्यात विविध राजकीय पक्षांचे नेते, केंद्री मंत्री आणि अनेक देशांचे राजदूत सहभागी होतील. पीएम मोदी दिल्लीत 12 वाजून 55 मिनिटांनी नवीन संसद भवनची पयाभरणी करतील. एक वाजता भूमीपूजनचा कार्यक्रम होईल. यानंतर 1:30 वाजता सर्वधर्म प्रार्थना होईल. 2:15 वाजता पंतप्रधान लोकांना संबोधित करतील.
चार मजली नवीन संसद भवनच्या उभारणीसाठी 971 कोटी अंदाजित खर्च होणार आहे. या खर्चातून 64500 चौ. मी. बांधकाम होणार आहे. हे बांधकाम भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापनदिनी पूर्ण केले जाईल. प्रत्येक संसद सदस्याला श्रमशक्ती भवनमध्ये कार्यालयासाठी 40 चौ. मी. वर्ग मीटर जागा उपलब्ध करून दिली जाईल, ज्याचे बांधकाम 2024 पर्यंत पूर्ण केले जाईल.
नवीन संसद भवनाचा निर्मितीचा प्रस्ताव उपराष्ट्रपती आणि राज्य सभेचे सभापती एम वैंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अनुक्रम राज्यसभा आणि लोकसभेत 5 ऑगस्ट 2019 ला केला होता. लोकसभा सचिवालयाकडून जारी एका पत्रकात म्हटले आहे की, नवीन संसद भवनचे डिझाईन अहमदाबादचे मेसर्स एचसीपी डिझाईन आणि मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे आणि याची निर्मिती टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड द्वारे करण्यात येईल.
नवीन संसद भवन हे जुन्या संसद भवनपेक्षा 17,000 चौ. मी. मोठे असेल. हे 971 कोटी रूपये खर्च करून 64,500 चौ. मी. क्षेत्रात उभारण्यात येईल. नवीन संसद भवनात लोकसभा सदस्यांसाठी सुमारे 888 सीट आणि राज्यसभा सदस्यांसाठी 326 पेक्षा जास्त सीट असतील.लोकसभा हॉल 1224 सदस्यांना एकाचवेळी समावून घेण्यास सक्षम असेल.
लोकसभा आणि राज्यसभेच्या कक्षांशिवाय नव्या भवनात एक भव्य संविधान कक्ष असेल. ज्यामध्ये भारताचा लोकशाही वारसा दर्शवण्यासाठी अन्य वस्तुंसह संविधानाची मूळप्रत, डिजिटल डिस्प्ले इत्यादी असेल. विधान कक्षात पाहुण्यांना जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून संसदीय लोकशाहीच्या रूपात भारताच्या प्रवासाबाबत जाणून घेता येईल.