मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या संशयास्पद कारसंबंधीत व्यक्ती मनसुख हिरेन याच्या हत्येचा तपास करत असलेल्या महाराष्ट्र एटीएसने मोठा खुलासा केला आहे. एटीएसचे म्हणणे आहे की, हत्या करण्यापूर्वी बहुतेक मनसुख हिरेनला जबरदस्तीने क्लोरोफार्म दिले होते. एटीएसने पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारवर हा संशय व्यक्त केला आहे, ज्यानुसार मृत्यूपूर्वी त्याच्या शरीरावर जखमांचे व्रण होते. मनसुख हिरेनचा मृतदेह 5 मार्चला ठाण्याजवळील रेतीबंदर येथे सापडला होता. सध्या एनआयकडून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या संशयित कारच्या प्रकरणाचा तपास केला जात आहे आणि ही केससुद्धा आपल्या हातात घेत आहे.
सध्या तपास अधिकारी हे शोधत आहेत की, गुन्ह्याच्या वेळी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे घटनास्थळी हजर होते किंवा नाही. मात्र, टेक्निकल मोबाईल टॉवर आणि आयपी इव्हॅल्युएशनच्या आधारावर मिळालेल्या माहितीत हे समजते की, जेव्हा मनसुख हिरेनची हत्या झाली, तेव्हा ते गाडीत हजर होते. सध्या वाझे एनआयएच्या ताब्यात आहेत आणि एजन्सीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. एटीएसने माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे (55) आणि नरेश धारे (31) यांना अटक केली आहे. नरेश धारे क्रिकेट बुकी आहे. सध्या या दोघांची चौकशी केली जात आहे आणि अनेक फॉरेन्सिक एक्सपर्ट्सच्या मदतीने काही गाड्यांद्वारे अनेक क्लू शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मनसुख हिरेनचा पोस्टमार्टम रिपोर्ट काय सांगतो?
मनसुख हिरेन यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, मृत्यूपूर्वी त्याच्या चेहर्यावर काही जखमांचे व्रण होते. यामध्ये असे वाटते की, त्याच्यासोबत जबरदस्ती केली गेली असावी आणि असे क्लोरोफॉर्म देण्यासाठी करण्यात आले असावे. पोस्टमार्ट रिपोर्टनुसार, मनसुख हिरेनच्या चेहर्यावर डावीकडे जखम आढळून आली होती. तसेच नाकाच्या वरील भागात सुद्धा जखम होती. याशिवाय उजवीकडे सुद्धा गालावर काही व्रण होते. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार मनसुख हिरेनच्या डोक्यावर आणि शरीराच्या अन्य भागात कोणतीही जखम नव्हती.
बेशुद्ध झाल्यानंतर हत्या करण्यासाठी घेऊन गेले?
एटीएस अधिकार्यांना संशय आहे की, जेव्हा मनसुख हिरेनला क्लोरोफॉर्म देण्याचा प्रयत्न केला गेला असेल तेव्हा त्याने संघर्ष केला असेल आणि यावेळी झटपटीत त्याच्या चेहर्यावर जखमा झाल्या. तपासकर्त्यांना संशय आहे की, क्लोरोफार्म दिल्यानंतर मनसुख हिरेन बेशुद्धा झाला असेल आणि नंतर त्यांची हत्या करण्यासाठी नेण्यात आले.