नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे तर तुमच्या कंपनीला पॅन आणि आधार नंबर उपलब्ध करून द्या. अन्यथा तुमचा पगार कापला जाऊ शकतो. इन्कम टॅक्स विभागाच्या नव्या नियमानुसार जर एखादा कर्मचारी हे दोन कागदपत्र उपलब्ध करून देत नसेल तर त्याच्या पगारातून 20% टीडीएस कापला जाईल.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने यासाठी 86 पानी सर्क्युलर जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, कर्मचार्यांना इन्कमटॅक्स अॅक्ट सेक्शन 206 अ अंतर्गत आपल्या कंपनीला पॅन आणि आधार नंबर देणे बंधनकारक आहे. जर एखादा कर्मचारी ही माहिती देत नसेल तर कंपनी त्याच्या पगारातून कपात करू शकते. माहिती न दिल्यास जास्त दराने टीडीएस कापण्याच्या तीन स्थिती आयकर विभागाने सांगितल्या आहेत. यामध्ये पहिला नियम हा आहे की, नियमाशी संबंधित तरतुदीमधील ठरलेल्या दराच्या हिशेबाने, दुसरा जो दर लागू होत असेल त्या हिशेबाने आणि तिसरा आयकरच्या 20 टक्के हिशेबाच्या श्रेणीप्रमाणे टॅक्स कापला जाईल.
सूचनेनुसार कर्मचार्याची कंपनी या तीन नियमांवर टॅक्सची रक्कम ठरवेल. त्यानंतर जास्त दराने टीडीएस कापला जाईल. सीबीडीटीने नियमात असेही म्हटले आहे की, जर कलम 192 अंतर्गत टीडीएसचा हिशेब केल्यानंतर रक्कम आयकरच्या टप्प्यात नसेल तर त्या कर्मचार्याला टॅक्स भरावा लागणार नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने हा नियम 16 जानेवारीपासून लागू केला आहे. हा नियम त्या लोकांना लागू होतो ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. हा नियम यासाठी आणला गेला आहे की, टीडीएस पेमेन्टवर लक्ष ठेवण्यासह या सेग्मेंटमध्ये रेव्हेन्यू सुद्धा वाढवता यावा. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये एकुण डायरेक्ट टॅक्स कलेक्शन चा 37 टक्के हिस्सा यातूनच आला होता.
Visit : bahujannama.com