नवी दिल्ली : वृत्तसंस्था- एका बाजूला कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे संपूर्ण जग जणू ठप्प झाल्यासारखे आहे. जगभरातील कच्च्या तेलाचे भाव कोसळत असताना भारतात मात्र, त्याचा फायदा सामान्य जनतेला मिळत नाही. केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात लीटरमागे ३ रुपयांनी वाढ केली आहे. एका सरकारी अधिसूचनेद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव गेल्या १० दिवसांपासून कमी होत होते. त्याचा परिणाम होऊन देशातील पेट्रोल व डिझेलच्या भावात घसरण होत होती. मात्र, त्यामुळे केंद्र सरकारच्या उत्पन्नात घट होत होती.
अधिक पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने आज एका आदेशाद्वारे पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लीटर ३ रुपयांनी वाढ केली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर प्रति लीटर १ रुपयांचा अधिक अधिभार लावला आहे. त्यामुळे देशात अगोदरच महाराष्ट्रात सर्वाधिक किंमतीने पेट्रोल व डिझेलची विक्री होत आहे.