वॉशिंग्टन डी सी ऑनलाईन टीम : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिंव्हमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. हा महाभियोग प्रस्ताव २३० विरुद्ध १९७ मतांनी संमत करण्यात आला आहे. सत्तेचा गैरवापर करत युक्रेनला राजकीय विरोधकांच्या चौकशीसाठी आदेश दिल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिंव्हमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर झालेले ट्रम्प हे तिसरे राष्टाध्यक्ष आहेत.
सीनेटमध्ये ट्रम्प यांचे बहुमत असल्याने तिथे हा प्रस्ताव संमत होण्याची शक्यता कठीण आहे. त्यामुळे अजून तरी ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीला धक्का बसण्याची शक्यता नाही, असे राजकीय तज्ञांचे मत आहे. मागील निवडणुकीत ट्रम्प यांचे विरोधक जो बिदेन यांना नुकसान पोहोचवण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनची मदत घेतली. ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदायमीर झेलेन्स्की यांच्या दबाव टाकून त्यांना बिदेन आणि त्यांचे पुत्र हंटर या दोघांची चौकशी सुरु करण्यास भाग पाडले. त्याची भरपाई राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी वेगळ्या स्वरुपात केल्याचा आरोप आहे.
https://twitter.com/realDonaldTrump/status/1207277859519238154
डेमोक्रॅटिक पक्षाने महाभियोग शब्दाचा अर्थ आणि विश्वासार्हता गमावली आहे, असे सांगत ट्रम्प म्हणाले की, माझ्यावरील महाभियोगासाठी डेमोक्रॅटिक सदस्यांनी घटनाबाह्य गोष्टींचा वापर केला आहे. ट्रम्प यांनी अमेरिका प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांना सांगितले की, महाभियोगाला तुम्ही मान्यता देऊ नका. तसे केले तर ही बाब अमेरिकन राज्यघटनेचे उल्लंघन ठरेल. हा महाभियोग मंजूर करुन तुम्ही लोकशाही विरोधात आहात हे सिद्ध केले आहे.
Visit : bahujannama.com