बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनासाठी राष्टीय एकतेचे स्मारक असलेले स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चोरट्याने विक्रीसाठी काढण्याचा धक्कादायक पृकार उघडकीस आला आहे. अट्टल चोर नटवरलाल मिथिलेश कुमार श्रीवास्तव ऊर्फ नटवरलाल याने ओएलएक्सवर चक्क स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या विक्रीची जाहिरात दिली आहे. विशेष म्हणजे यासाठी तब्बल 30 हजार कोटींची बोलीही लागली आहे.
याआधी नटवरलाने विदेशी पर्यटकांना भारताचे राष्ट्रीय वैभव ताजमहाल तीनदा, लाल किल्ला दोनदा, राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि 545 खासदारांना विकले होते. याच घटनेशी मिळतीजुळती घटना समोर आली आहे.
यावेळी एका अट्टल चोराने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला विक्रीसाठी काढला आहे. गुजरातमधील एका महाभागाने ओएलएक्सवर चक्क स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या विक्रीची जाहिरात दिली आहे. कोरोनाच्या महामारीच्या लढ्यात मोदी यांनी जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत गुजरातमधील एका महाभागाने चक्क ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विक्रीला काढले आहे. यामुळे गुजरातमधील लोकांचे डोळे मोठे झाले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल, आयर्न मॅन ऑफ इंडिया यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाने ओळखला जातो. 2018 मध्ये हा पुतळा उभारण्यात आला यासाठी तब्बल 2 हजार 989 कोटींचा खर्च झाला होता. स्टॅच्यू ऑफ युनिटीवर झालेल्या खर्चामुळे मोदी सरकारला टीकेला सामोरे जावे लागले होते. आता हीच संधी साधून एका व्यक्तीने ओएलक्सवर स्टॅच्यू ऑफ युनिटी विक्रीसाठी काढला आहे.
काय आहे जाहिरात –
‘सध्या देशात रूग्णालय आणि हेल्थकेअर इक्विपमेंट्ससाठी पैशांची गरज असल्याने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विकण्याची वेळ आली आहे. असे नमूद केले आहे. दरम्यान,‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विक्रीसाठी काढून मस्करी केल्याचे समजताच कंपनीने ओएलएक्सवरून जाहीरात तात्काळ हटवली आहे. मात्र सोशल मिडीयावर या गोष्टीची तुफान चर्चा चालू आहे.